Satara News : महाराष्ट्र राजकारणात मागील काही दिवसांमध्ये भूकंपाची मालिकाच सुरू आहे. शिवसेना पक्षात झालेल्या अभूतपूर्व फुटीनंतर अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडून गेल्या. शिवसेनापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. काँग्रेसमधील दिग्गज नेतेही महायुतीशी गठबंधनात बांधले गेले. एवढ्या मोठ्या घडामोडीनंतर आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठा खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. सातारा जिल्ह्यातला काँग्रेसचा एक मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आंबेडकर यांनी प्रत्यक्ष नाव घेतले तरी त्यांच्या निशाण्यावर पृथ्वीराज चव्हाणच असल्याचे बोलले जात आहे.
सातारा जिल्ह्यामधील काँग्रेस (Congress) पक्षाचा एक बडा नेता येत्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षात दाखल होणार आहेत. कारण त्या नेत्याला भाजपत जाऊन राज्यपाल व्हायचे आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. ते कराड येथे बोलत होते. आंबेडकरांच्या या विधानानंतर आता सातारा जिल्ह्यातला काँग्रेसच्या नेत्याबाबत चर्चा रंगली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सातारा आणि आंबेडकर (Prakash Ambedkar) ज्या ठिकाणी हे वक्तव्य केले ते कराड भागातील मोठे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुढे येते. यामुळे आता या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे यावर आता काँग्रेस आणि विशेषत: प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाण काय उत्तर देणार, हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.