Rahul Awade, Prakash Awade Tara Rani Aghadi Party Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prakash Awade In BJP: कोल्हापूरमध्ये 'मास्टर'खेळी; आवाडेंनी कमळ हाती घेतलं; विरोधक हळवणकरांनीही मनं जिंकली

Kolhapur And Ichalkaranji News : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहुल आवाडे यांची भाजपमधून उमेदवारी निश्चित समजली जाते. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आवाडे यांचे राजकीय विरोधक माजी आमदार सुरेश हळवणकर हे आवडे यांच्या पक्षप्रवेशामुळे कोणती भूमिका घेणार अशी चर्चा मतदारसंघात रंगली होती.

Rahul Gadkar

Kolhapur News : गेली पाच वर्ष इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे हे भाजप प्रवेशाची वाट पाहत होते. वेळ आणि काळ येताच अखेर तो दिवस उजाडला. अपक्ष आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) आणि त्यांची पुत्र राहुल आवाडे यांनी बुधवारी (ता.25) केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहुल आवाडे यांची भाजपमधून उमेदवारी निश्चित समजली जाते. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आवाडे यांचे राजकीय विरोधक माजी आमदार सुरेश हळवणकर हे आवडे यांच्या पक्षप्रवेशामुळे कोणती भूमिका घेणार अशी चर्चा मतदारसंघात रंगली होती. त्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, याच माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी भाजपची संस्कृती पुन्हा एकदा अधोरेखित केली.

भाजप (BJP) हा राज्यातील शिस्तप्रिय पक्ष असा समजला जातो. भाजपमधील राजकीय संस्कृती अनेक जण जोपासताना पाहायला मिळतात. इचलकरंजीतील आमदार प्रकाश आवाडे यांचे राजकीय कट्टर विरोधक माजी आमदार सुरेश हळवणकर यांची आवाडे यांच्या पक्षप्रवेशामुळे गोची निर्माण झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत हळवणकर हे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून ते इच्छुक होते. मात्र, अपक्ष आमदार प्रकाश आवाडे हे भाजपचे मित्रपक्ष असल्याने आणि पुत्र राहुल आवाडे यांच्या उमेदवाराची घोषणा केल्यानंतर त्यांची कोंडी निर्माण झाली होती.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यात आवाडे पिता-पुत्रांचा भाजप प्रवेश होणार हे निश्चित झाल्यानंतर माजी आमदार हळवणकर काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र, आज आमच्या कोल्हापुरात आल्यानंतर महासैनिक दरबार हॉल येथे हळवणकर यांनीच भाजपची संस्कृती दाखवून दिली.

आपल्या पक्षात विद्यमान आमदार येत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. हळवणकर यांनीच आमदार पिता पुत्रांना स्टेजवर आणत त्यांचे स्वागत केले. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आवडी पिता पुत्रांचा भाजप पक्षप्रवेश संपन्न झाला.

या सर्व घटनेमुळे उपस्थित स्थळी आमदार आवाडे पिता पुत्रांची भाजप प्रवेशाची चर्चा होतीच. शिवाय सर्वात जास्त चर्चा होती ती म्हणजे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी स्वतःहून त्यांना स्टेजवर आणून त्यांचा केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते पक्षप्रवेश करून घेतला. त्यामुळे पक्षातूनच हाळवणकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT