Mahayuti News : नवरात्रीच्या मुहूर्तावर महायुती मोठा धमाका करणार; उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार, पण...

Mahayuti seat-sharing of Assembly Election : अमित शाहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्यासाठी आपापसातील मतभेद बाजूला सारून सर्वांनी महायुतीसाठी काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय आपलं लक्ष्य हे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना रोखण्याचे असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
Amit Shaha, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Amit Shaha, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 25 Sep : भाजपचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते महाराष्ट्रात आले आहेत.

महातुतीच्या जागावाटपा संदर्भातील बैठका, भाजप नेत्यांवरील जबाबदारी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते महाराष्ट्रात आले आहेत. अशातच मंगळवारी जागावाटपाबाबत महायुतीची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीनंतरही युतीत 90 जागांवरील तिढा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यामुळे आता जागावाटपासंदर्भात महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांची लवकरच दिल्लीत आणखी एक बैठक होणार असून उमेदवारांची पहिली यादी नवरात्रीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अमित शाह यांनी ज्या जागाबाबत युतीतील मित्र पक्षांमध्ये तिढा आहे. त्या जागांवर दोन दिवसात बैठक घेऊन तो तिढा सोडवण्याच्या सूचना केल्या आहेत.

Amit Shaha, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Ambadas Danve News : अमित शहांचा तीस जागा जिंकण्याचा दावा, ठाकरे गटाचा नेता म्हणतो शक्यच नाही

त्यामुळे उद्याच युतीतील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार आहे. विद्यमान आमदारांच्या जागा त्या पक्षासाठी सोडल्या जातील. शिवाय ज्या मतदारसंघात भाजपचा आमदार जिंकू शकत नाही, अशा जागा अजित पवारांची (Ajit Pawar) राष्ट्रवादी किंवा शिंदेसेनेला देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

अमित शाह यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर ज्या जागांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्या जागांसदर्भात युतीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

शाहांच्या सूचना विधानसभेसाठी मतभेद विसरा

दरम्यान, अमित शाहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्यासाठी आपापसातील मतभेद बाजूला सारून सर्वांनी महायुतीसाठी काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय आपलं लक्ष्य हे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना रोखण्याचे असल्याचंही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

Amit Shaha, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Naigaon Assembly: मराठवाड्यातील 'या' जागेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये रस्सीखेच सुरु

तर विदर्भासाठी त्यांनी मिशन 45 आणि मराठवाड्यासाठी मिशन 30 चा नारा दिला आहे. संभाजीनगरमधल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी आपापल्या पक्षांचे सर्व्हे शाहा यांच्याकडे दिल्याची माहिती आहे. तर जागावाटपासंदर्भात महायुतीची आणखी एक बैठक दिल्लीत होणार असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com