Prashant Koratkar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prashant Koratkar : जामीन मिळाला, पण कोरटकर तुरुंगातच राहणार? नेमकं कारण काय?

Prashant Koratkar bail Granted : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरने आपल्या संभाषणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अवमानास्पद वक्तव्य केलं होतं.

Rahul Gadkar

Kolhapur News : छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती आणि संभाजी महाराज यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंग्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर दिलासा मिळाला आहे. न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या कोरटकरचा कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 13 मार्चला न्यायालयीन कोठडी संपत असताना कोरटकरला आज न्यायालयाकडून अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. 7 एप्रिल रोजी झालेल्या दोन्ही बाजूचा युक्तिवादानंतर न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

25 फेब्रुवारी रोजी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी कोरटकरने दिली होती. या संभाषणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती आणि संभाजी महाराज यांच्या बद्दल अवमानास्पद वक्तव्यही केलं होतं. यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पण पोलिसांच्या हातावर तुरी देत तो महिनाभर फरार होता. त्याला 25 मार्च रोजी तेलंगणा राज्यातील मंचरियाल येथून अटक करण्यात आली होती. तर न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर देखील तपासासाठी पोलिसांनी 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीची मागणी केली होती. पण कोरटकरला 13 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली होती.

यावेळी सरकारी वकील असीम सरोदे यांनी, कोरटकरला खूप उशिरा जामीन मंजूर झालेला आहे. अशा प्रकरणात अनेकांना खूप लवकर जामीन मंजूर होतो. मात्र त्याला जामीन मिळू नये यासाठी आम्ही लढा दिला. त्याच्या जीवाला बाहेर धोका आहे, असा युक्तिवाद आम्ही केला होता. मात्र अटी व शर्तींवर त्याला जामीन मंजूर झाला आहे. कोरटकरला पन्नास हजार रुपयांचा जात मुचलका, तपासासाठी ज्या ज्या वेळी पोलीस बोलावतील त्या त्यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर राहणे, फिर्यादी आणि साक्षीदार यांना धमकवायचं नाही अशा या प्रमुख तीन अटींवर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

कोरटकर पाठीशी कोण घालतंय? : इंद्रजीत सावंत

छत्रपती शिवाजी महाराजांसह छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन देत न्यायालयाने दिलासा दिला. यानंतर आता इंद्रजीत सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, युगपुरूषाबद्दल अपशब्द काढणाऱ्यांना जास्तीजास्त शिक्षा करण्यासाठी राज्यकर्त्यांना विनंती आहे. यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलावीत. तर कोरटकर फोन करण्यासाठी माझा नंबर कोणी दिला? त्याला पाठीशी कोण घालतंय? त्याच्या सोबत कोण होते? याचीही उत्तर माझ्यासह जनतेला मिळायला हवीत.

आता माझ्याबाबत न्यायालयात खोटी माहिती दिली. माझी बदनामी केली. त्याबद्दल मी अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. पण मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सात दिवसात मिळाले नाही तर कायदेशीर मार्गाने न्याय मिळवू, असाही इशारा त्यांनी दिला आहे. तर गृहमंत्री रायगडावर येऊन कडक कायद्याची घोषणा करत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. पण त्यांच्याच पक्षात असणाऱ्या अनेकांनी अपमानस्पद वक्तव्य केली आहेत. त्याचं काय? असाही सवाल इंद्रजीत सावंत यावेळी उपस्थित केला आहे.

दरम्यान प्रशांत कोरटकरला जामीन मिळाला असला तरी आणखीन दोन दिवस त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची शक्यता आहे. अजून दोन दिवस तरी कोरटकरची सुटका होणार नाही. कारण जामीनची प्रोसिजर ज्या कोर्टमध्ये करावी लागणार आहे. ते कोर्ट रजेवर आहे. यातच उद्या शासकीय सुट्टी असल्याने हे काम शुक्रवारवर (ता.11) जाणार आहे. त्यानंतरच कोरटकर यांची जामीनवर सुटका होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT