Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरच्या जामिनावर आज सुनावणी; आत की बाहेर? काय निर्णय होणार?

Prashant Koratkar Bail Hearing : प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या तो तरूंगात आहे. यादरम्यान त्याने जामिनीसाठी अर्ज केला आहे.
Prashant Koratkar
Prashant Koratkar Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक विधान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सध्या तो येथील कळंबा कारागृहात असून अंडासेलमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान आज त्याने केलेल्या जामिनाच्या अर्जावर सुनावणी होणार असून त्याचा कोठडीतला मुक्काम वाढणार की तो आज बाहेर येणार याचा फैसला होणार आहे.

राष्ट्रपुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य करत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी प्रशांत कोरटकरने दिली होती. यानंतर त्याला तेलंगणातून अटक करण्यात आली होती. यानंतर त्याची न्यायालयाने पोलिस कोठडीत रवानगणी केली होती. सध्या कोरटकर 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कळंबा येथील अंडासेलमध्ये त्यास ठेवण्यात आले आहे. आज मंगळवारी (ता. 1) त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होत आहे. यामुळे कोल्हापूरसह राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रशांत कोरटकरने केले होते. तसेच कोरटकरने इंद्रजित सावंत यांना देखील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली होती. ज्याप्रकरणी कोल्हापूर येथील जूना राजवाडा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. पण तब्बल 1 महिना कोरटकर पोलिसांना गुंगारा देत होता. शेवटी त्याला तेलंगणा येथून जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.

Prashant Koratkar
Prashant Koratkar News : 'ती' अलिशान गाडी कोरटकरची नाही, तुषार कलाटेंचा खुलासा

यादरम्यान त्याची न्यायालयाने पोलिस कोठडीत रवानगी केली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत रविवारी संपली. त्याचवेळी त्याचे वकील सौरभ घाग यांनी तत्काळ जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याच्यावर न्यायालयाने मंगळवारी (ता.1) सुनावणी निश्चित केली होती.

Prashant Koratkar
Prashant Koratkar Issue : कोरटकरवर हल्ला, भुजबळ यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'वकीलांनाही भावना...'

न्यायालय आवारात मोठा फौजफाटा

दरम्यान याच्याआधी दोन वेळा कोरटकरवर न्यायालय आवारात संतप्त जमावाकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून आता पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून कमालीची खबरदारी घेतली जातेय. सकाळपासूनच न्यायालय परिसरासह प्रवेशद्वारावरच मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com