Prashant Koratkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prashant Koratkar : कोरटकरला बुकी चालक चौधरीची मदत, 30 मार्चपर्यंत पुन्हा कोठडी, वाहनेही जप्त होणार

Prashant Koratkar Remand Extended: प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी झालेल्या सुनावणीत सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी कोरटकरला आणखीन पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती.

Rahul Gadkar

Kolhapur News : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपची संभाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य प्रशांत कोरटकरने केलं होतं. तसेच त्याने इंद्रजीत सावंत यांना देखी धमकी दिली होती. याप्रकरणी त्याला अटक झाली असून न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. जी आज (ता.28) संपली. यामुळे त्याला पोलिसांनी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने त्याला दिलासा न देता 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे फरार काळात बुकीचालक आणि काही व्यक्तींकडून कोरटकरला मदत झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. दरम्यान कोरटकरने वापरलेली दोन्ही वाहने पोलिसांकडून जप्त केली जाणार आहेत. त्यासाठी पथक नागपूरला रवाना झाल्याचीही माहिती कोल्हापूर पोलिसांनी न्यायालयात दिली.

पोलीस कोठडीची आजची मुदत संपल्यानंतर कोरटकरला पुन्हा आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी झालेल्या सुनावणीत सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी कोरटकरला आणखीन पाच दिवसांची पोलीस कोठही द्यावी अशी मागणी न्यायालयापुढे केली.

फरार काळात कोरटकरला धीरज चौधरी, हिफाजत आली, प्रशिक बडवेकर, राजू जोशी यांनी मदत केल्याचे चौकशीत समोर आले आहे. याबाबतची माहिती कोल्हापूर पोलिसांनी न्यायालयात दिली. मात्र तपासात आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता असल्याने कोरटकरला पाच दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती.

गेली महिनाभर कोरटकरने ज्या ज्या हॉटेलमध्ये मुक्काम केला आहे. त्या हॉटेल मालकांना नोटीस देऊन त्यांना प्रत्यक्षात हजर राहण्याची सूचना केली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्यांना समोरासमोर घेऊन चौकशी केली जाईल.

शिवाय ज्या वाहनातून कोरटकर फिरला आहे ती वाहने पोलिसांच्या कडून जप्त करण्यात येणार आहेत. त्यातील एका गाडीचा शोध कोल्हापूर पोलिसांना लागला असून ती जप्त करण्यासाठी पोलिसांचे एक पथक नागपूरला रवाना झाले असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

दरम्यान कोरटकरणे ज्या धीरज चौधरी व्यक्तीचे नाव घेतले तो नागपूरमधील एक बुकी चालक असल्याचे सरकारी वकील असीम सरोदे त्यांच्याकडून त्याला सांगण्यात आले. यामुळे आता कोरटकर यांच्या मागे कोण बडा व्यक्ती आहे का? हे देखील तपासात केल्यास समोर येण्याची शक्यता आहे.

तर आतापर्यंत जी नावे निष्पन्न झाली आहेत. याच्या खोलात जाऊन तपास करावा लागणार आहे. कोल्हापूर पोलिसांच्या काही महत्त्वाचे धागेद्वारे हाती लागले आहेत. त्या दृष्टीने तपास सुरू असून कोरटकरला दोन जातीमध्ये तेढ निर्माण करायचा होता का? याचाही तपास करावा लागेल असा युक्तीवाद वकीलांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT