Prashant Koratkar : धक्कादायक! शिवद्रोही कोरटकरच्या संपर्कात पोलिस अधिकारी? महेश कोंडावार अडचणीत येण्याची शक्यता

Mahesh Kondawar : शिवद्रोही प्रशांत कोरटरकरला पोलिसांनी तेलंगणा राज्यातून अटक केली आहे. पण तो फरार होण्यात कोणाचा हात होता आता असा सवाल केला जातोय. दरम्यान आता शिवद्रोही कोरटकरच्या संपर्कात एक पोलिस अधिकारी असल्याचा समोर आले आहे.
Prashant Koratkar
Prashant KoratkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल गरळ ओकणाऱ्या प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी अखेर तेलंगणा राज्यात बेड्या ठोकल्या आहेत. फक्त महापुरूषांना अपमानच नाही तर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची याने धमकी दिली होती.

याप्रकरणी कोरटकर याला अटक झाली असून त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आता त्याला फरार होण्यास कोणी मदत केली? कोणाकडे राहिला? त्याला कोणी कोणी सहकार्य केलं असे प्रश्न उपस्थित केले जातायत. अशावेळी पोलिस अधिकारी महेश कोंडावार यांचे नाव समोर येत असून त्यांनी कोरटकर याची चंद्रपुरात भेट घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यातील पोलिस दलावरच आता संशय व्यक्त केलं जातयं.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस वक्तव्य करण्यासह कोरटकरने इतिहास संशोधक सावंत यांना धमकी दिली होती. त्याप्रकरणी कोल्हापूरच्या जूना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर गुन्हा दाखल होताच तो फरार झाला होता. तब्बल 30 दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता. पण त्याच्या साथिदाराच्या एका चुकीमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

यानंतर आता अनेक प्रश्नांना फाटा फुटला असून प्रशांत कोरटकर याची पोलिस अधिकारी महेश कोंडावार यांनी बेट घेतल्याचे उघड झाले आहे. या भेटूीमुळे कोंडावार अडचणीत येण्याची शक्यता असून काही महिन्यांच्या आधी ते चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेतील बदलीवरून नाराज होते. तर त्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख करण्यात आले होते. मात्र त्यांनी पद स्वीकारले नव्हते. तर रजेवर जाणे पसंद केले होते.

Prashant Koratkar
Prashant Koratkar : कोरटकर कोण आहे? तो कसा पळाला अन् कसा सापडला? 29 दिवसांची A टू Z कुंडली

पण आता प्रशांत कोरटकर हा अकरा मार्च रोजी चंद्रपुरात मुक्कामी असताना कोंडावार यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात आता कोल्हापीर पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून याच सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोंडावार कोरटकरची भेट झाल्याचे दिसत आहे. यामुळे मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणावरून चंद्रपूर पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी प्रतिक्रियादिली असून हे प्रकरण कोल्हापूर पोलिसांकडे असल्याने आपण काही बोलू शकत नसल्याचे म्हटलं आहे.

Prashant Koratkar
Prashant Koratkar News : 'कुठंय तो..', हातात चप्पल घेऊन शिवप्रेमीची कोरटकरच्या दिशेला धाव

दरम्यान या प्रकरणात कोरटकर हा राज्यातील काही बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला होता. वकील असीम सरोदे यांनी देखील असाच दावा करताना, या प्रकरणात कोरटकरला नागपूर व कोल्हापुरातील काही पोलिस अधिकारी मदत करत असल्याचा दावा त्यांनी केला होता. यानंतर आता कोरटकरची भेट पोलिस अधिकारी महेश कोंडावार यांनी घेतल्याचे उघड झाल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com