Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pravin Gaikwad Attack : टार्गेट प्रवीण गायकवाडांचा खून पण आम्ही आडवे आलो..., संभाजी ब्रिगेडच्या जखमी कार्यकर्त्यांनी अजित पवारांना सांगितला मारहाणीचा थरार

Sambhaji Brigade Protest : उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावरती आले असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली आणि प्रवीण गायकवाडांच्या तोंडाला काळं फासणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली.

Jagdish Patil

Solapur News, 16 Jul : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळ फासत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर राज्यभरातील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

अशातच मंगळवारी (ता.15) उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावरती आले असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली आणि प्रवीण गायकवाडांच्या तोंडाला काळं फासणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली.

यावेळी आरोपी दीपक काटेसह त्याच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणीही या कार्यकर्त्यांनी केली. त्याचवेळी त्यांनी गायकवाड यांच्यावर नेमका हल्ला कसा झाला आणि हल्लेखोरांचा प्लॅन काय होता याचा थरारक घटनाक्रम देखील सांगितलं.

संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष शिरीष जगदाळे आणि जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांनी सांगितलं की, जेव्हा प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करण्यात आली तेव्हा आम्ही ती फेकणाऱ्यांना विरोध केला. त्यावेळी शिवधर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाडांना सोडून आम्हाला बेदम मारहाण केली.

धक्कादायक बाब म्हणजे या दोघांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण आली, असं अजित पवारांना सांगितलं. शिवाय यावेळी आम्ही आडवे आलो नसतो तर या हल्लेखोरांचा प्रवीण गायकवाड यांचा खून केला असता तेच त्यांचं टार्गेट होतं, असा आरोपही जगदाळे आणि भोसले यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

रविवारी (ता.13) प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथील कमलाराजे चौक येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांच्या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजीराजेंच्या नावाचा एकेरी उल्लेख केला जातो. ते नाव बदलावे तसंच स्वामी समर्थांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा राग मनात धरत शिवधर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासलं.

त्यानंतर गायकवाड यांना मारहाण देखील करण्यात आली होती. दरम्यान, प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT