Prithviraj Chavan to Election Commission Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan to Election Commission : एक्झिट पोलचे आकडे कानावर आले अन् चव्हाणांकडून 'इलेक्शन कमिशन'ला नवा सल्ला!

Prithviraj Chavan On CM Eknath Shinde : दुष्काळी परिस्थितीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही साधला आहे, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत?

Umesh Bambare-Patil

Prithviraj Chavan on Exit Poll Result : लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान 1 जून रोजी संपले आणि एक्झिट पोलचे निकालही समोर आले. यानुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकारच सत्तेत येणार असल्याचे दिसत आहे.

तर महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. हे एक्झिट पोलचे निकाल समोर आल्यापासून भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. कारण देशात मोदी सरकार तर येतच आहे, शिवाय राज्यातही भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरत आहे.

तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून विशेषता काँग्रेस नेत्यांकडून एक्झिट पोलच्या आकडेवारीत तथ्य नसल्याचे वारंवार सांगितले जात आहे. एवढच नाहीतर 295 जागा इंडिया आघाडीला मिळणार असल्याचाही दावा केला गेला आहे.

दरम्यान एक्झिट पोलची आकडेवारी समोर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी थेट निवडणूक आयोगावर टिप्पणी करत सल्लाही दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'एक्झिट पोलचे जे आकडे आहेत ते चुकीचे ठरतील. 2004 मध्ये ज्याप्रमाणे इंडिया शायनिंग ची जाहिरात करून पुन्हा वाजपेयी सरकार येईल असे एक्झिट पोलने सांगितले, मात्र त्याच्या उलट चित्र झाले त्यामुळे यावेळी ही तशी शक्यता आहे.'

तसेच आमदार चव्हाण म्हणाले, 'महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमताने निवडून येतील असा मला विश्वास आहे. ईव्हीएम मशीन बाबत लोकांच्या मनात गंभीर शंका आहेत, त्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही.

लोकांचा विश्वास बसेल असे यंत्रणा निवडणूक आयोगाने तयार करणे गरजेचे आहे. काँग्रेसची (Congress) बॅलेट पेपरवर मतदान घ्यावी अशी पहिल्यापासूनची मागणी आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.' असा सल्लाही दिला.

याशिवाय 'मुख्य निवडणूक आयुक्त नेमणुकीसाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि देशाचे सरन्यायाधीश अशी समिती कार्यरत होती. मात्र या वर्षाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निवडणूक या समितीमधून सरन्यायाधीशांना हटवले आहे. पंतप्रधान व एक मंत्री असल्याने या समितीत विरोधी पक्षनेत्यांचे काहीही चालणार नाही हे स्पष्ट आहे.'

'त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास आम्ही पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयुक्त नेमण्याची जी नवी पद्धत सुरू केली आहे, त्यात बदल करू आणि सरन्यायाधीशांना पुन्हा या समितीत घेऊ.' अशी महत्वपूर्ण घोषणा राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

मुख्यमंत्र्यांना दुष्काळाचे गांभीर्य नाही -

राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुट्टीवर जात आहेत. त्यांना दुष्काळाचे गांभीर्यच नाही. नवी लोकसभा गठीत होत नाही, तोपर्यंत आचारसंहिता शिथिल न करण्याचा निर्णय विचित्र असल्याचे सांगत दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीवेळी आचारसंहितेची बाधा येत नाही. मात्र सध्यस्थितीत आचारसंहितेचे कारण सांगून शासन काहीही करत नाही. अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकार व मुख्यमंत्र्यावर केली.

तसेच काँग्रेसच्या आमदाराकडून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेऊन त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे बहुमत येईल असा विश्वास आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT