Dilip Sopal : दिलीप सोपल पुन्हा आमदार होणार...? ‘तुतारी’ घेऊन की मशालीवर...?

Barshi Assembly Election 2024 : दिलीप सोपल विधानसभा लढवणार का?. लढवली तर कोणत्या पक्षाकडून?, याची चर्चा रंगली आहे. माझा पक्ष शरद पवार असे नेहमी सांगणारे सोपल विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवारांची ‘तुतारी’ हाती घेतील का?, अशी कुजबूज बार्शीच्या राजकीय आखाड्यात सुरू झाली आहे.
Dilip Sopal
Dilip SopalSarkarnama

Solapur, 02 June : दिलीप सोपल सोलापूरच्या राजकारणातील दिलखुलास आणि बेरकी व्यक्तिमत्व. अगदी हसत खेळत कोणाचा गेम कसा करायचा?, हे माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या भाषणातूनच शिकावे. त्यांचे भाषण म्हणजे अगदी मैफिलच असते. आता तेच सोपल पाच वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर लोकसभा निवडणुकीत सक्रिय झाले होते. धाराशिवचे ठाकरेंचे शिलेदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी त्यांनी प्रचाराचा धडाका लावताना विरोधकांचा त्यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. आता हेच सोपल विधानसभा लढवणार का?. लढवली तर कोणत्या पक्षाकडून?, याची चर्चा रंगली आहे. माझा पक्ष शरद पवार असे नेहमी सांगणारे सोपल विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवारांची ‘तुतारी’ हाती घेतील का?, अशी कुजबूज बार्शीच्या राजकीय आखाड्यात सुरू झाली आहे.

सोलापूर जिल्हा तीन लोकसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. सोलापूर मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदासंघ हे जिल्ह्यातील आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातील माण-खटाव आणि फलटण हे दोन मतदारसंघ सातारा जिल्ह्यातील आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका हा धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडला गेला आहे. याच बार्शीत (Barshi) लोकसभेचे धुमशान नुकतेच घडून गेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीत बार्शीत महायुतीकडून आमदार राजेंद्र राऊत, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांनी किल्ला लढवला. गेली पाच वर्षे शांत आणि पक्षीय राजकारणापासून लांब असलेल्या सोपल यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी जोरदार बॅटिंग केली. आपल्या नेहमीच्या शैलीत त्यांनी विरोधकांना चिमटे काढले.

लोकसभेच्या सातव्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर आलेल्या कल चाचण्यांच्या अंदाजात धाराशिवमध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील ह्या पिछाडीवर असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. त्यामुळे बार्शीतील महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

Dilip Sopal
Exit Poll 2024 : भाजपचे मातब्बर नेते पिछाडीवर

ओमराजे यांचा थेट मतदारांशी असलेल्या ‘कनेक्ट’मुळे त्यांना निवडणुकीत फायदा झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यासाठी माजी मंत्री दिलीप सोपल, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी किल्ला लढवला, तर राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांच्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी आपली ताकद पणाला लावली.

मतदानोत्तर कलचाचण्यांच्या अंदाजानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीविषयी अनेकांना आशा निर्माण झाली आहे. महायुतीकडून विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांचा दावा असणार आहे. ते अपक्ष लढणार की भाजपच्या तिकिटावर हे पाहावे लागेल. महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले हे विधानसभा इच्छूक असू शकतात.

Dilip Sopal
Dhairyasheel Mohite Patil : एक्झिट पोलनंतर धैर्यशील मोहिते पाटलांनी माढ्यातील मताधिक्क्याचा थेट आकडाच सांगितला...

आमदार राजेंद्र राऊत यांना टक्कर देऊ शकणारा, तेवढाच तोलामोलाचा उमेदवार म्हणून आजही माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याकडे पाहिले जाते. ते विधानसभच्या निवडणुकीत उतरणार का? आणि उतरले तर कोणत्या पक्षाकडून?, असे प्रश्न आहेत. सोपल हे कायम शरद पवार समर्थक म्हणूनच ओळखले जातात. मध्यंतरी कोविडनंतर पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनी घरी जाऊन सोपल यांच्या तब्यतेची विचारपूस केली होती. याशिवाय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी पुन्हा एकदा पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे सोपलही मोहिते पाटील यांच्यासह शरद पवारांचे सहकारी होतात, हे पाहावे लागेल.

माझा पक्ष ‘शप’ पक्ष म्हणून अभिमानाने सांगणारे दिलीप सोपल हे पवारांविषयी निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होतात की पुन्हा मशाल हाती घेऊन ठाकरे यांच्यासोबत कायम राहतात?, याचा उलगडा थोड्याच दिवसांत होणार आहे. मात्र, त्यांच्या राजकीय खेळीची बार्शीत उत्सुकता आहे.

Dilip Sopal
Sudhir Mungantiwar : ‘यह कहाॅं आ गया मैं...’ ; एक्झिट पोलनंतर सुधीर मुनगंटीवारांचा डोक्याला हात!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com