Prithviraj Chavan Devendra Fadnavis sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan On Devendra Fadnavis : 'फडणवीसांना थोडीतरी लाजलज्जा असेल तर...', पृथ्वीराज चव्हाण संतापले

Prithviraj Chavan BJP Adhiveshan Devendra Fadnavis :भ्रष्टाचारातून त्यांनी महायुतीचे सरकार स्थापन केले आहे. तुरुंगात माणसं टाकून दहशत निर्माण केली जात आहेत, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

Umesh Bambare-Patil

Prithviraj Chavan News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पुण्यातील अधिवेशनात विरोधकांना ठोकून काढा. आदेशाची वाट पाहू नका, असा सल्ला पदाधिकाऱ्यांना दिला . 'गृहमंत्र्यांच्या तोंडी ठोकाठोकीची भाषा शोभत नाही. त्यांना थोडीजरी लाजलज्जा असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा.' अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले.

आज (सोमारी) पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप तसेच उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली.

'भाजपच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेशाची वाट पाहू नका विरोधकांना ठोकून काढा, असे नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. पैशाचा वापर, सत्तेचा दुरुपयोग आणि निवडणूक आयोगाचा दुरुपयोग ज्यांनी सत्तेसाठी केला. फडणवीस सारख्या गृहमंत्र्याच्या तोंडून ठोकाठोकीची भाषा शोभत नाही. याची निवडणूक आयोग दखल घेऊन कारवाई करणार का?' असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

भ्रष्टाचारातून त्यांनी महायुतीचे सरकार स्थापन केले आहे. तुरुंगात माणसं टाकून दहशत निर्माण केली जात आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असेही चव्हाण म्हणाले.

नेमके काय म्हणाले होते फडणवीस

'विरोधकांना उत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा.ज्याल बॅटींग करायची त्याने करावी पण अट एकच हिट विकेट होऊ नका. कारण समोरच्यावर बोलण्यापेक्षा आपल्यावर बोलला तर पुढीच चार दिवस त्याचे उत्तर देत बसावे लागेल.'असे फडणवीस रविवारी (ता.21) पुण्यात झालेल्या भाजपच्या अधिवेशनात म्हणाले.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT