Union Budget 2024 : ‘शॉर्ट मेमरी’ असलेल्या पब्लिकला पंतप्रधान मोदी कोणतं खास गिफ्ट देणार? महाराष्ट्र वाट बघतोय...

Lok Sabha Election Assembly Election PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत मोठा दणका बसल्यानंतर महायुतीला आला विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.
Narendra Modi, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Narendra Modi, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मंगळवारी बजेट सादर करणार आहे. महायुतीला या बजेटमधून मोठ्या अपेक्षा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या अपेक्षा पूर्ण करतील का, महाराष्ट्राला मोठं गिफ्ट मिळणार का, हे काही तासांत कळेल. पण मोदींना महाराष्ट्रासाठी सढळ हाताने बरसात करावी लागणार, हे सध्याच्या राजकीय स्थितीतून दिसते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर ‘शॉर्ट मेमरी’ असलेल्या पब्लिकला मोदी विधानसभेपर्यंत लक्षात राहील, असे काय देणार याची चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या बजेटमध्ये अर्थमंत्री अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेसह अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्या. त्यासाठी तिजोरीत एवढा पैसा कुठून येणार, हे एक कोडं असलं तरी अजित पवारांच्या म्हणण्यानुसार ते दिलेला वादा पूर्ण करतात. त्यानुसार योजनांना पैशांची कमी पडू देणार नाहीत, असे मानून चालूयात. त्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागेल. मोदींच्या खांद्यावरही अपेक्षांचे ओझे टाकले असेल. महाराष्ट्र हे भाजपसाठी महत्वाचे राज्य आहे. लोकसभेतील पराभवाने पक्षाला बहुमतापासून दूर नेले आहे. त्यामुळे विधानसभेसाठी महायुती कामाला लागली आहे.   

Narendra Modi, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Lok Sabha Session : नितीश कुमारांना मोदी सरकारचा झटका; सर्वात मोठी मागणी बासनात...

लोकसभेतील स्थिती

लोकसभा निवडणुकीत 48 मतदारसंघांपैकी महाविकास आघाडीने 30 जागा जिंकत महायुतीला धूळ चारली. महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. महायुतीतील 17 जागांपैकी भाजपला केवळ नऊ जागा मिळाल्या आहेत. मागील निवडणुकीत भाजपला 23 जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे या निवडणुकीत सर्वात मोठा फटका भाजपलाच बसला आहे. त्यामुळे विधानसभेआधी महायुतीला जणू धडकी भरली आहे. त्यामुळे जेवढा सरकारी निधी थेट लोकांपर्यंत जाईल, तेवढा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी केंद्राकडूनही अनेक अपेक्षा आहेत.

मुंबई, पुण्याला मोठ्या अपेक्षा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सीतारमण यांच्याकडून बजेट मांडले जाणार असल्याने महाराष्ट्रासाठी विविध योजना, प्रकल्प दिले जातील, अशी अपेक्षा राज्यकर्त्यांनाही आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यासह मुंबईत महायुतीला धक्का बसला आहे. मुंबईत नवीन लोकल, मेट्रोचे जाळे, त्यासाठी भरीव निधी, रस्त्यांचा विकास, झोपडपट्टी पूनर्वसन अशा विविध योजनांसाठी निधी द्यावा लागेल.

विदर्भ, मराठवाड्यात एखादी केंद्रीय संस्था, रेल्वे प्रकल्प किंवा इतर प्रकल्प, नवीन रेल्वे, रस्ते तसेच विविध विकास योजनांसाठी आश्वासनांची खैरात करावी लागेल. पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. निधी अभावी रेंगाळलेल्या मेट्रो मार्गाला गती मिळताना दिसत नाही. पुणे रेल्वे स्टेशनचे विस्तारीकरण, जायका प्रकल्प रखडला आहे. रिंगरोडसाठी निधी, पंतप्रधान आवास योजनेतून मिळणारा निधी, असे अनेक मुद्दयांवर केंद्राकडून अपेक्षा आहेत. राज्यातील इतर भागांतीलही अनेक प्रश्न आहेतच.

Narendra Modi, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Economic Survey 2024 : सगळं काही एकदम ओके! बजेटआधी सरकारने दाखवले ‘अच्छे दिन’

लोकसभा निवडणुकीत महायुतीने मोदींच्या कामावर मतं मागितली होती. पण अपेक्षित यश मिळाले नाही. आता विधानसभेसाठी लाडकी बहीण योजना आणि इतर काही मोजक्या योजना घेऊन मतदारांसमोर जाताना सरकारला मोदींचा चेहराही पुढे न्यावा लागणार आहे. त्यासाठी केंद्रीय बजेटमधूनही अनेक अपेक्षा आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भाजपच्या अधिवेशनात लोकांची मेमरी शॉर्ट असते, असे म्हटले आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत मतदारांच्या लक्षात राहील, असे काही गिफ्ट पंतप्रधान मोदी देणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com