Prithviraj Chavan
Prithviraj Chavan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जातीयवादी प्रवृत्तींकडून देशात हुकुमशाही; काँग्रेसचा विचारच अधोगती रोखेल

जालिंदर सत्रे

पाटण : काँग्रेस पक्ष हा विचारावर आधारित पक्ष असून या पक्षाचा विचार कमकुवत नाही. मात्र, जातीयवादी प्रवृत्ती हुकुमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न देशात करित आहेत. राज्यघटना व देशाचे संविधान वाचविण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची असुन काँग्रेसचा विचारच देशाची चाललेली अधोगती रोखु शकेल. यासाठी सर्वांनी एकदिलाने संघटीत होणे काळाची गरज आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

पाटण येथील श्रीराम पतसंस्थेच्या कै. भाऊ मोकाशी सभागृहात आयोजित नवनियुक्त पदाधिकारी नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हिंदुराव पाटील, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा धनश्री महाडीक, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा सरचिटनिस नरेंद्र देसाई, अॅड. राजन भिसे, अरविंद घाडगे, एल. एम. पवार, इंद्रजित चव्हाण, तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वंदना आचरे, अभिजीत पाटील, तालुकाध्यक्ष पांडुरंग यादव उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाला बाहेर ठेवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. सरकार स्थापन झाले आणि कोरोना महामारी सुरु झाली. त्यामुळे सरकार पूर्णवेळ विकासाकडे लक्ष देऊ शकले नाही, असे स्पष्ट करुन श्री. चव्हाण म्हणाले, नवीन पदाधिकाऱ्यांनी बुथ कमिट्या स्थापन कराव्यात. पदाधिकाऱ्यांनी कामे वाटुन घ्यावीत. महिन्याला बैठका घेऊन वातावरण निर्मिती करावी. लोकांना संकटात मदत केली तरच काँग्रेस पक्ष जीवंत आहे, आपल्या मदतीला येतो अशी, जनतेची धारणा झाली पाहिजे.

काँग्रेसचे प्रांतिक सदस्य हिंदुराव पाटील म्हणाले, तीन पक्षाचे राज्यात असलेल्या शासनाने कोरोनाचा मुकाबला केला असुन यशस्वी वाटचाल सुरु आहे. काँग्रेस पक्षाचे संघटन मजबुत करुन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात सक्षम कार्यकर्त्यांना संधी द्यायची आहे. तालुक्यात असलेल्या गटातटाच्या राजकारणातुन तालुक्याला बाहेर काढायचे असुन आत्मविश्वासाने पक्षाला उभारी देण्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागा कारण काँग्रेसची बिजे खोलवर रुजली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT