मराठा आरक्षण अशोक चव्हाण यांच्यामुळे नाही, तर केंद्र सरकारमुळे गेलं

(Deglur-Biloli by-Election) भुलथापांना बळी न पडता शंकरराव चव्हाण यांना अभिवादन म्हणून, अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात केलेल्या विकासकामांची पावती आणि स्व. रावसाहेब अंतापूरकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मतदान करा.
Balasaheb Thorat-Ashok Cahvan
Balasaheb Thorat-Ashok CahvanSarkarnama

नांदेड ः देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मराठा आरक्षण अशोक चव्हाण यांच्यामुळे गेलं असा बुद्धीभेद करणाऱ्या व्हिडिओ क्लीप विरोधकांकडून व्हायरल केल्या जात आहे. पण ही वस्तुस्थिती नाही, मराठा आरक्षण उपसमितीचे अशोक चव्हाण अध्यक्ष आहे, तर मी सदस्य. या प्रक्रियेतला एक भाग म्हणून मराठा आरक्षणासाठी अशोकरावांनी केलेले प्रयत्न घेतलेली मेहनत मी पाहिले आहे.

त्यामुळे मराठा आरक्षण गेलं ते केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे, अशोक चव्हाणांमुळे नाही हे मी खात्रीने सांगू शकतो, असे म्हणत राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सत्तेवर आल्याबरोबर आम्ही शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी दिली.

कुठल्याही अटी, किचकट कागपत्र नाही, फक्त दोन अंगठ्यावर ही कर्जमाफी दिली, असेही थोरात यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहिर सभेत थोरात बोलत होते.

भाजपचे शेतकरी प्रेम, कळवळा खोटा आहे. शेतकरी विरोधी तीन कायदे आणले, दिल्लीत शांततेने आंदोलन करणाऱ्या भाजपच्या मंत्र्यांनी त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना मारून टाकले हे याचे शेतकरी प्रेम आहे का?

त्यामुळे कुणाच्याही भुलथापांना बळी न पडता शंकरराव चव्हाण यांना अभिवादन म्हणून, अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात केलेल्या विकासकामांची पावती आणि स्व. रावसाहेब अंतापूरकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मतदान करा. कुठेही फाटाफूट होऊ देऊ नका. हक्काच्या माणसाला मदत करा आणि मनगट धरून कामे करून घ्या, असे आवाहन देखील थोरात यांनी केले.

Balasaheb Thorat-Ashok Cahvan
धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक; सायबर क्राईमला दिली तक्रार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com