Prithviraj Chavan with Handcart holders sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad News : पृथ्वीराज चव्हाण संतापले! म्हणाले, हातगाडाधारकांना धमकावणाऱ्या गुंडांना खपवून घेणार नाही...

Karad Handcart holders हातगाडाधारकांना काही गुंड धमकावीत हप्ता वसुली व त्यांच्या हातगाड्यांचे नुकसान करत आहेत. त्या व्यवसायिकांची आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज भेट घेतली.

Umesh Bambare-Patil

-सचिन शिंदे

Karad News : शांत व संयमी कऱ्हाड शहरात काही गुंड कायदा व सुव्यवस्था दहशीतीच्या माध्यामातून बिघडवणार असतील तर, ती दहशत कधीही खपवून घेणार नाही, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृष्णा घाटावरील हातगाडाधारकांना दिली. सलग दोन दिवस प्रीतिसंगम बाग परिसरातील हातगाडाधारकांना काही गुंड धमकावीत हप्ता वसुली व त्यांच्या हातगाड्यांचे नुकसान करत आहेत. त्या व्यवसायिकांची आमदार चव्हाण यांनी आज भेट घेतली.

त्यावेळी हातगाडाधरकांना आमदार पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी अश्वासित करत यामध्ये लक्ष घालण्याचीही ग्वाही दिली. यावेळी काँग्रेस Congress शहराध्यक्ष ऋतुराज मोरे, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात, प्रशांत देशमुख उपस्थित होते.

आमदार चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन घाटावरील हातगाडाधारकांशी संवाद साधला. यावेळी हातगाडीधारक व्यवसायिकांनी हप्ता मागणाऱ्या गुंडाचा त्रास होतो, ते कसा त्रास देतात. हप्ता कसा मागतात, याची सर्व माहिती त्यांनी यावेळी आमदार चव्हाण यांना दिली. आम्हाला न्याय द्यावा, गुंडगिरीतून आधार द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी आमदार चव्हाण यांनी त्यांना विश्वास देत कोणीही गुंडगिरी करत असेल व कायदा सुव्यवस्था बिघडवत असेल तर खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट केले. कायदा सुव्यवस्था कोणी बिघडविण्याचा प्रयत्न करत असेल खंडणीखोरांना तत्काळ अटक केले जाईल, त्याबाबत पोलिस अधीक्षकांसह उपाधिक्षकांसह सुचना करतो.

कराड शहरातील कायदा सुव्यवस्था अजिबात बिघडू नये, यासाठी पोलीसांनी तत्काळ काळजी घेतली पाहिजे. कृष्णा घाटावर विशेष पथक नेमले जावे व तात्काळ योग्य ती कारवाई करावी, अशा सूचना यावेळी आमदार चव्हाण यांनी पोलिसांना दिल्या. इथून पुढे अशा घटना घडल्या तर पोलिसांना तात्काळ संपर्क करा आणि तरीसुद्धा मार्ग निघत नसेल तर मला थेट मला फोन करा, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी हातगाडाधारकांना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT