-संभाजी थोरात
Karad Congress News : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार भाजपसोबत येतील असे वक्तव्य केले होते. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता, त्यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले. ते म्हणाले, आपण या अगोदरही याबाबत बोलल्यानंतर मी अडचणीत आलो होतो, मला खूप ऐकावं लागलं. मला जे वाटलेलं ते बोललो होतो. त्यावर मी आता काय बोलणार नाही.
कर्नाटकच्या निवडणुकीदरम्यान, प्रचार दौऱ्यात असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी राष्ट्रवादी काँग्रेस NCP भाजपबरोबर संपर्कात असल्याचे वक्तव्य केल्याने खळबळ माजली होती. त्यावर राज्यातून अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या.
महाविकास आघाडीतील नेतेही या वक्तव्यावर नाराज होते. त्यानंतर शिंदे, फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आमदारांसह सहभागी झाले. तसेच राष्ट्रवादीला नऊ मंत्रीपदे ही मिळाली. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारही भाजपसोबत येतील असे वक्तव्य केले.
यावर श्री.चव्हाण यांना विचारले असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आपण या अगोदरही याबाबत बोलल्यानंतर मी अडचणीत आलो होतो. मला खूप ऐकावं लागलं. मला जे वाटलेलं ते मी बोललो होतो. त्यावर मी आता काहीही बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.