Prithviraj Chavan, Narendra Modi
Prithviraj Chavan, Narendra Modi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan On Modi : आता मोदींना हरवायचंय हे लोकांचं ठरलंय; पृथ्वीराज चव्हाणांची जहरी टीका

हेमंत पवार

Satara Political News : पंतप्रधान कऱ्हाडला येत आहेत त्यांचे स्वागत आहे. त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मंगळसूत्र विकणार, दागिन्याचे ऑडीट करणार, आतंकवादी या नसलेल्या गोष्टी घातल्या आहेत. ते मात्र दहा वर्षांत काय केले हे सांगत नाहीत. यंदा चारसो पार नाही तर मोदी सत्तेतही येणार नाहीत. 2014 मध्ये जनतेने काँग्रेसला पराभूत केले, तसेच आता नरेंद्र मोदींना पराभूत करायचे ठरवले आहे, अशी जहरी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांची सोमवारी (ता. 29) कऱ्हाडला सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चव्हाणांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी चारशे पारची घोषणा केली आहे. त्यावर चव्हाण म्हणले, पंतप्रधान मोदींनी येथे येऊन दहा वर्षांत काय केले हे सांगितले पाहिजे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मंगळसूत्र विकणार, दागिन्याचे ऑडीट करणार, आतंकवादी या नसलेल्या गोष्टी घातल्या. तुमच्या दहा वर्षांत तुम्ही काय केले ते सांगत नाही. तुमचे चारशे पार येणार असतील, तर आमच्या जाहीरनाम्यात काय आहे याची कशाला काळजी करता?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच चारशे पारची घोषणा केली आहे. मला आश्चर्य वाटले की त्यांनी पाचसो पार अशी का घोषणा केली नाही. यंदा चारसो पार नाही तर सत्तेतही मोदी येणार नाहीत. त्यांनी कितीही धावपळ केली, कितीही सभा घेतल्या तरी मोदींचे काही खरे नाही. 2014 साली जनतेने काँग्रेसला पराभूत केले तसेच आता दहा वर्षांनी नरेंद्र मोदींना पराभूत करायचे ठरवले आहे, अशी टीकाही चव्हाणांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दीड लाख मतांनी उदयनराजे पडतील

गत वेळी उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि आघाडीचे उमेदवार होते. त्यावेळी त्यांच्याबद्दल चांगले बोललो होतो. कारण उमेदवारांबद्दल खरे असू किंवा नसो चांगले बोलावे लागते. त्यांनी पक्ष सोडून ते भाजपकडून उभे राहिल्यावर आम्ही 90 हजारांनी त्यांचा पराभव केला. त्यावेळी आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोनच पक्ष होतो. सध्या आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना व अन्य मित्रपक्ष आहेत. त्यामुळे यंदा ते सुमारे दीड लाख मतांनी ते पडतील, असा दावाही चव्हाणांनी केला.

घोषणा नको...

भाजप यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस करत आहे, त्यांचे स्वागत आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो, असे सांगून आमदार चव्हाण Prithviraj Chavan म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्याऐवजी त्यांना थेट भारतरत्न द्यावे. त्यामुळे काही थोडीशी त्यांची मते वाढतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT