Prithviraj Chavan On Uddhav Thackeray  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan: 'मविआ' सरकार कोसळल्यानंतर ठाकरेंचं काय चुकलं हे छातीठोकपणे सांगणाऱ्या चव्हाणांनी आता दाखवून दिली शिवसेनेच्या वकिलाची कोर्टातली मोठी चूक

Shivsena Politics: एकनाथ शिंदेंनी 2022मध्ये केलेल्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. यावेळी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी परखडपणे आणि सर्वात पहिल्यांदा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नेमकं काय चुकलं हे समोर आणलं होतं.

Deepak Kulkarni

Karad News: एकनाथ शिंदेंनी 2022मध्ये केलेल्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. यावेळी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी परखडपणे आणि सर्वात पहिल्यांदा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नेमकं काय चुकलं हे समोर आणलं होतं. यावेळी चव्हाण यांनी पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाईची संधी उद्धव ठाकरेंकडे होती, मात्र त्यांनी ज्या घाई गडबडीने मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, ती माझ्या मते फार मोठी चूक झाली, त्यांनी विधिमंडळाला सामोरं जायला पाहिजे होतं, असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केलं.आता त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वकिलानं कोर्टात केलेली मोठी चूक उघडकीस आणली आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे गेल्या तीन महिने प्रकृतीच्या कारणास्तव सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. त्यांच्यावर राजधानी दिल्लीत वैद्यकीय उपचार सुरू होते. आता उपचारानंतर दिल्लीहून कराडला परतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हा संदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान घडलेल्या प्रसंगावरुन मोठा दावा केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, धनुष्यबाण चिन्हासंदर्भात सुनावणीदरम्यान,सर्वोच्च न्यायालयानं युक्तिवाद आम्ही जानेवारीत ऐकतो, आता वेळ नसल्याचं म्हटलं होतं. यावेळी निवडणुका हे राजकीय पक्षांचं कामच आहे. त्यासाठी तयार असायला पाहिजे. त्यामुळे निवडणुका होत राहतील, असंही न्यायालयानं नमूद केलं होतं. यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू कोर्टात मांडणारे वकील शांत बसून राहिल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.

यावेळी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) वकिलानं सर्वोच्च न्यायालयासमोर प्रत्येक नागरिक दोन निवडणुका लढतो. एक केंद्रीय आणि दुसरी स्थानिक. गेली दहा वर्ष स्थानिक निवडणुका झालेल्या नाहीत, हा मुद्दा मांडायला पाहिजे होता. मात्र, त्यांच्या वकिलांनी मांडलाच नाही, ही बाब त्यांची चुकल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टपणे म्हटलं.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या वकिलानं पुन्हा चुकीचा युक्तिवाद केला. भाजपनं 73 आणि 74 वी घटनादुरुस्ती पूर्णता मोडून काढली आहे. त्यामुळे लोकांना आपला नगरसेवक, पंचायत समिती सदस्य निवडायचा अधिकार राहिलेला नाही. हा वेगळा विषय आहे. त्याकरिता आम्हाला चिन्हाचा निर्णय स्थानिक निवडणुका होण्यापूर्वी द्या, अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयासमोर मांडायला पाहिजे होती.

मात्र, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वकिलांकडून हा महत्त्वाचा मुद्दा सुनावणीदरम्यान मांडलाच गेला नाही. त्यांनी न्यायालयासमोर गेल्या दहा वर्षे राज्यात निवडणुका झालेल्या नाहीत, ही अतिशय महत्त्वाची बाब वकिलांनी न्यायालयासमोर का सांगितली नाही, असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाला सामोरं जायला पाहिजे होतं, विधिमंडळात आपलं म्हणणं मांडायला पाहिजे होतं, चर्चा झाली असती, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचं तीन पक्षाचं सरकार का स्थापन केलं, हे महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा सांगता आलं असतं, भाजपची काय भूमिका आहे, हेही स्पष्ट झालं असतं.

अटल बिहारी वाजपेयींसारखं नुसतं भाषण करुन निघून सभागृहातून बाहेर जाण्याचा पर्यायही उद्धव ठाकरे यांच्याकडे होता, मात्र तेही न करता, त्यांनी मतदान करुन घ्यायला पाहिजे होतं. कमी मतं पडून त्यांचा पराभव जरी झाला असता, तरी पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन जनतेच्या समोर झालं असतं, असा अभ्यासू दावा पृथ्वीराज चव्हाण मविआ सरकार पडल्यानंतर छातीठोकपणे केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT