Tejashwi Yadav reaction : नितीश कुमारांनी शपथ घेताच तेजस्वी यादव यांना खडबडून जाग; निकालानंतर तब्बल 6 दिवसांनी पहिली प्रतिक्रिया... काय-काय म्हणाले?

Nitish Kumar oath ceremony : शपथविधी झाल्यानंतर काही मिनिटांतच यादव यांनी सोशल मीडियातून नितीश कुमारांना शुभेच्छा देणारी पोस्ट टाकली आहे.
Nitish Kumar, Tejashwi Yadav
Nitish Kumar, Tejashwi YadavSarkarnama
Published on
Updated on

Bihar election result response : बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएच्या त्सुनामीत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे पानिपत झाले. पक्षाला जेमतेम विरोधी पक्षनेतेपद मिळेल, एवढ्याच जागा जिंकता आले. पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का होता. या निकालानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी, जन सुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांच्यासह अनेक विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या. पण तेजस्वी यादव मात्र अद्यापही समोर आलेले नाहीत.

ऐतिहासिक विजयानंतर नितीश कुमार यांनी गुरूवारी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री व 26 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह एनडीएशासित विविध राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिही शपथविधीला उपस्थित होते. या शपथविधीनंतर तेजस्वी यादव यांना खडबडून जागा आली.

शपथविधी झाल्यानंतर काही मिनिटांतच यादव यांनी सोशल मीडियातून नितीश कुमारांना शुभेच्छा देणारी पोस्ट टाकली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आदरणीय नितीश कुमारजी यांचे बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. नवे सरकार लोकांच्या आशा आणि अपेक्षांबाबत आपल्या आश्वासनांची पुर्तता करेल आणि बिहारमधील लोकांच्या जीवनात सकारात्मक व गुणात्मक परिवर्तन आणेल, अशी अपेक्षा तेजस्वी यादव यांनी व्यक्त केली आहे.

Nitish Kumar, Tejashwi Yadav
CJI Bhushan Gavai news : निवृत्तीआधी CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल; दोन न्यायमूर्तींचा राज्यपालांबाबतचा निकाल बदलताना इशाराही दिला...

दरम्यान, निकालानंतर जणू अज्ञातवासात गेलेल्या तेजस्वी यादव यांनी अद्यापही निकालावर सार्वजनिकपणे आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. पक्षाच्या आमदारांच्या बैठकीमध्ये त्यांनी यावर भाष्य केलेले असू शकते. मात्र, सोशल मीडिया किंवा माध्यमांसमोर त्यांनी अद्याप एक शब्दही उच्चारलेला नाही. विशेष म्हणजे, पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Nitish Kumar, Tejashwi Yadav
Malegaon Election news : अजितदादांची कट्टर विरोधकांसोबत हातमिळवणी; माळेगावच्या निवडणुकीत वारं फिरलं, शरद पवारांनी अपक्षांना सोबत घेत टाकला डाव...

निवडणुकीत एनडीएला २४३ पैकी तब्बल २०२ जागा मिळाल्या असून त्यामध्ये भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला ८५ जागा मिळाल्या असून चिराग पासवान यांच्या पक्षाला १९ जागांवर विजय मिळाला आहे. महाआघाडीला केवळ ३५ जागांवर समाधान नावे लागले आहे. त्यामध्ये आरजेडीला २५ जागा मिळाल्या आहेत. मागील निवडणूक आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com