Prithviraj Chavan, Narendra Modi
Prithviraj Chavan, Narendra Modi sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Congress : पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, देशात परिवर्तन अटळ...

शशिकांत धुमाळ

निमसोड : राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेत समविचारी पक्ष एकत्र येत आहेत. देशाचे दुभंगलेले खंड जोडण्याचे काम होत आहे. वाढती महागाई, बेकारी, जातीयवाद ,कमकुवत अर्थव्यवस्था, विखंडनाचा वाद आदींमुळे हुकूमशाही केंद्र सरकारच्या हातात अर्थव्यवस्थेचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणूकीत परिवर्तन झाल्याचे दिसून येईल, असा ठाम विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

निमसोड (ता. खटाव) येथे धैर्यशील देशमुख विकास सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनानंतर कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे होते. यावेळी निमंत्रक रणजितसिंह देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, उपस्थित होते.

राज्यात राजकीय अस्थिरता दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी हेतूपुरस्कर केली जात आहे. आमच्या स्वभिमानास , अस्मितेस जाणीवपूर्वक गालबोट लावले जात आहे , महाराष्ट्र कदापीही खपवून घेणार नसल्याचे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,

सहकाराच्या माध्यमातून चांगले कार्यकर्ते तयार होतात. सर्वांना बरोबर घेणारा कार्यकरताच दीर्घकाळ टिकतो. प्रभाकर घार्गे यांना सहकाराचा मोठा वारसा आहे. त्यांच्या माध्यमातून दुष्काळी खटाव तालुक्यात मोठे काम आहे. त्यांना अडचणीत आणण्यासाठी काही लोकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. मात्र, त्यांचे काम मोठे असल्याने त्यांचे राजकारण कधीही मोडीत निघणार नाही.

खटाव तालुक्यात ऊस क्षेत्र वाढु लागले आहे. आणखी एखादा साखर कारखाना तसेच प्रक्रिया उद्योग निर्माण होण्याची गरज आहे. खटाव मध्येही रणजित देशमुख, प्रभाकर घार्गे एकत्र काम करत आहेत ही समाधानाची बाब असून आगामी काळात निश्चितच दिशादर्शक ठरेल.

प्रभाकर घार्गे म्हणाले,राजकारण, समाजकारणात दिवसेंदिवस बदल होत चालला. शेतीपानी आल्यामुळे लोकांचे सर्व प्रश्न सुटले नाहीत तर वाढणार आहेत.लोकांना न्याय देण्यासाठी प्रक्रिया उद्योगाची गरज आहे. संपूर्ण खटाव तालुका म्हणून काम केले पाहीजे.सरकार कोणाचेही असूनसुद्धा विकासासाठी एकत्र आले पाहिजे. हम करसो प्रवृत्ती मोडीत काढण्याची गरज असल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT