Prithviraj Chavan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : राज्यात आंदोलनं का सुरू आहेत? माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मोठं कारण

Prithviraj Chavan on Protest in Maharashtra : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आंदोलनं सुरू आहेत. या आंदोलनांच्या मागचे कारण माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे...

Sachin Fulpagare

विशाल वामनराव पाटील

Maharashtra Politics News : राज्यात दुष्काळाची परिस्थिती असून, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न राज्यात आहेत. सरकार कोणाचेही असले तरी रोजगार निर्मिती होत नाही. रोजगार निर्मिती नसल्यानेच राज्यात आंदोलनं सुरू असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

कराड येथे आयोजित 18 वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. या वेळी राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, रयत कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, जिल्हा कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"राज्यात जनावरांच्या छावण्या सुरू करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. पाऊस मुबलक झाला नसल्याने अनेक ठिकाणी आतापासूनच टँकर सुरू करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असून, सरकारने गांभीर्याने हा प्रश्न हाताळण्याची गरज आहे", असे या वेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

"पंतप्रधान मोदींसोबत बैठक घेऊन, सगळ्यांचं एकमत करून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा लागेल"

"जुलै २०१४ मध्ये क्रिमिलेअरची अट टाकून मराठा समाजाला मी मुख्यमंत्री असताना १६ टक्के आरक्षण दिलं होतं. त्यानुसार आरक्षण मिळायला सुरुवातही झाली होती. पण पुढे नवीन सरकार आले आणि नवीन सरकारला कोर्टात हे आरक्षण टिकवता आले नाही. मी ज्या फॉर्म्युल्याने मराठा आरक्षण दिले होते, त्याच फॉर्म्युल्याने होऊ शकेल. पण यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक घेऊन सर्व देशात एकमत घडवून आणून करावे लागले", असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Edited By Sachin Fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT