Prithviraj Chavan, Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan News : पृथ्वीराज चव्हाणांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात ; शंभूराज देसाई यांचा चव्हाणांना फोन

सरकारनामा ब्यूरो

Sambaji Bhide Statement Mahatma Gandhi : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा ई मेल आणि फोन आल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अंकुश सोराटे याला राजगडच्या पायथ्याशी असणाऱ्या वेल्हा गावातून कराड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दूरध्वनीवरून चव्हाण यांच्याशी संपर्क साधला आहे. नेमका काय प्रकार घडला, याबाबत त्यांनी माहिती घेतली असून कडक कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.

संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून आक्रमक झालेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क केला आहे. अंकुश सोराटे याच्यावर सायबर कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

राज्यात विविध ठिकाणी भिडेंच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. अमरावतीत यशोमती ठाकूर यांनी भिडेंच्या विरोधात आंदोलन केलं होतं, त्याला प्रत्युत्तर म्हणून भिडे समर्थकांनी अमरावतीच्या कोतवाली पोलीस ठाण्यात आंदोलन करीत यशोमती ठाकूर यांना अटक करण्याची मागणी केली आहे. याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे.

संभाजी भिडे यांच्यावर अमरावतीत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकपूर्व जामीनासाठी आज (सोमवारी) भिडे समर्थकांकडून जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येणार आहे. संभाजी भिडे यांनी अमरावतीमध्ये महात्मा गांधी संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT