Sambaji Bhide Statement ON Mahatma Gandhi : भिडेंच्या समर्थनार्थ भाजप खासदार अनिल बोंडे मैदानात ; यशोमती ठाकूर यांना अटक करा..

Amravati News : यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Yashomati Thakur and Anil bonde
Yashomati Thakur and Anil bondeSarkarnama
Published on
Updated on

Amravati : संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा कॉंग्रेसकडून राज्यभर निषेध करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे. भिडे यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी आश्वासन दिले आहे. तर दुसरीकडे भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी या वादात उडी घेतली आहे.

Yashomati Thakur and Anil bonde
Ghosapuri Water Supply Scheme : 'घोसपुरी'चे पाणी पेटणार ; महाविकास आघाडी-भाजपमधील वाद चिघळणार !

संभाजी भिडे यांच्या विधानानंतर काँग्रेसने अमरावती शहरात जोरदार आंदोलन केले. यावेळी काँग्रेस नेत्या, आमदार यशोमती ठाकूर यांनी भिडे यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात केली आहे.

कालपर्यंत भाजपचा संभाजी भिडे यांच्याशी संबंध नाही, असे सांगणारे भाजपचे खासदार अनिल बोंडे हे खुद्द पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी केली आहे. काल यशोमती ठाकूर यांनी सुद्धा संभाजी भिडे यांना 24 तासात अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांना दिला आहे.

Yashomati Thakur and Anil bonde
Nitesh Rane Slams Sanjay Raut : राणेंचे राऊतांना सडेतोड उत्तर ; आनंद दिघेंच्या विरोधात राऊतांनी...

सत्तेतील अनेक मंत्री आणि आमदारही भिडे यांच्या त्या वक्तव्याचा निषेध करीत आहेत. अशातच अनेक पक्षसंघटनानी याबाबत आवाज उठवल्यानंतर अमरावती येथील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये संभाजी भिडे यांच्याविरुद्ध आणि कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या सर्व संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी संभाजी भिडे यांच्या महात्मा गांधी यांच्यावरील त्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला. भिडे यांच्यावर कारवाई केले जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com