Devendra Fadanvis, Prithviraj Chavan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Assembly Monsoon Session : पृथ्वीराज चव्हाण संतापले; म्हणाले, भ्रष्ट शिक्षणाधिकाऱ्यांची ईडीमार्फत चौकशी करा...

Prithviraj Chavan आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली मागणी अत्यंत योग्य व गंभीर स्वरूपाची आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केले.

Umesh Bambare-Patil

Assembly Monsoon Session : शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई केली जावी, त्यासाठी कायद्यात योग्य बदल करावेत. त्या भ्रष्टाचारी अधिकार्‍यांची ईडीतंर्गत कारवाई केली जावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करत विधानसभेत प्रश्नोत्तरच्या तासात शिक्षण विभागातील गंभीर घटना उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्यात योग्य ते बदल केले जातील, तसेच नाशिकच्या शिक्षणाधिकार्‍यापासूनच ईडीतंर्गत कारवाई करण्यासाठी शिफारस केली जाईल, असेही सभागृहात स्पष्ट केले.

नाशिक महापालिका शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांना 50 हजाराची तर लिपिकाला पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले होते, त्या घटनेची माहिती देताना शिक्षण विभागात Education Department अशा प्रकारचे विविध ठिकाणी होत असलेला भ्रष्टाचार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याची माहिती आमदार चव्हाण Prithviraj Chavan यांनी विधानसभेत सभागृहाला दिली.

सबंधित भ्रष्ट अधिकार्‍यावर कोणतीही ठोस कारवाई न केल्याने सरकार हतबल आहे. आमदार चव्हाण म्हणाले, नाशिकच्या प्रकरणात राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी लिहलेल्या पत्रात 72 भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या यादीत 36 शिक्षणाधिकारी आहेत, असे उल्लेख होता. त्या अधिकार्‍यांची चौकशी केली तरी त्यांना पुन्हा पदावर घ्यावे लागते. विधिमंडळाचा कायदा करून काही बदल करता येईल का, ज्यांच्या चौकशा झाल्या त्यांनाच पुन्हा पदावर घ्यायचे हे योग्य नाही.

तरी अशा घटना घडत असताना यावर ठोस कारवाई न केल्याने विधिमंडळाची हतबलता दिसते. नाशिकला शिक्षणाधिकार्‍याच्या घराची लाचलुचपत विभागाने झडती घेतली असताना 50 लाखांच्या रोकडीसह 32 तोळे सोन्यासह बँकेच्या खात्यावर 32 लाखरूपये आढळले आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना कडक शासन व्हावे, यासाठी कायद्यात तरतुदी कराव्यात. त्यांची ईडीतर्फे अवैध सावकारी अंतर्गत कारवाई केली जावी.

आंमदार चव्हाण यांनी केलेली मागणी अत्यंत योग्य व गंभीर स्वरूपाची आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केले. ते म्हणाले, त्याबाबत कायद्यात बदल करून त्याच व्यक्ती पुन्हा त्या ठिकाणी येणार नाहीत. कायद्याची पळवाट शोधणाऱ्यांची काम करणे योग्य नाही. त्या अधिकाऱ्यांना त्या त्या ठिकाणी नियुक्त केले जाणार नाही, त्यांची ईडीतंर्गत करवाई होईल. नाशिकच्या अधिकाऱ्यांपासून त्याची सुरूवात होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT