Prithviraj Chavan-Atul Bhosale  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Politic's : पृथ्वीराजबाबा, तुमचा पराभव नेमका कशामुळं झालाय? हे एकदा ठरवा : अतुल भोसलेंचा टोला

Prithviraj Chavan Vs Atul Bhosale : आमदार डॉ. अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. दीर्घकाळ सत्तेत राहिल्यामुळे सत्ता गेल्याचा मानसिक धक्का त्यांना बसल्याचा दावा भोसले यांनी केला.

विश्वभूषण लिमये

Solapur, 23 August : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच वेगवेगळे गौप्यस्फोट केले आहेत. (स्व.) गोपीनाथ मुंडे यांचा काँग्रेस प्रवेश आणि कराड दक्षिणमधील पराभवाची अनेकदा वेगवेगळी कारणे सांगितली होती. त्यावरून भाजप नेते आमदार डॉ. अतुल भोसले यांनी पृथ्वीराजबाबांवर जोरदार हल्ला चढवला.

आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, पृथ्वीराजबाबा चव्हाण हे अनेक वर्ष सत्तेत राहिलेले आहेत, त्यांच्या वडिलांपासून त्यांच्या मातोश्रीपर्यंत सर्वजण सत्तेत राहिलेले आहेत, त्यामुळे एकदम सत्ता गेल्यामुळे त्यांना मानसिकदृष्ट्या धक्का बसलेला आहे.

विधानसभा निवडणूक झाल्या झाल्या ते म्हणाले होते की, ईव्हीएम हॅक झाल्यामुळे माझा पराभव झाला आहे. त्यानंतर मतदार यादीत दुबार मतदार होते; म्हणून माझा पराभव झाला, असा दावा केला हेाता. त्यानंतर यंत्रणा खूप वापरली म्हणून माझा पराभव झाला आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता, असे भोसले म्हणाले.

जर ईव्हीएमच हॅक होती, तर बाकीच्या या गोष्टी करण्याची गरजच नव्हती. आधी पृथ्वीराजबाबा चव्हाण यांनी नीट ठरवावं की कशामुळे नेमका त्यांचा पराभव झाला आहे, असा टोला अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला.

ते म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने तुम्हाला संदेश दिलाय की, आज तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय ते योग्य नाही. नवीन प्रतिनिधी म्हणून मला संधी मिळाली, त्याचं सोनं करण्यासाठी मी 100 टक्के प्रयत्न करतोय.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात नुकतीच SIR प्रक्रिया पार पडली. त्याचा डेटा सर्वजनिकरित्या आज उपलब्ध आहे. पृथ्वीराजबाबा चव्हाण वेळोवेळी वेगवेगळी आकडेवारी सांगतात, त्यामुळे त्यांना नेमकं गांभीर्याने किती घ्यायचं, हा प्रश्न आहे. आम्ही त्यांना गांभीर्याने घ्यायचे बंद केले असून मतदारसंघातील कमांकडे लक्ष द्यायचं, एवढंच ठरवलेलं आहे, असेही आमदार भोसले यांनी स्पष्ट केले.

गोपीनाथ मुंडे यांच्या कथित काँग्रेस प्रवेशाबाबत अतुल भोसले म्हणाले, गोपीनाथ मुंडे हे आज आपल्यामध्ये नाहीत, त्यामुळे त्यांच्याबाबत बोलणं हे योग्य नाही. मी जर आज असं वक्तव्य केल की, आमचे स्वर्गीय आजोबा असं सांगत होते की, आनंदराव चव्हाण यांना शेतकरी कामगार पक्षातून काँग्रेसमध्ये कसं आणलं ह्याची मला माहिती आहे. या असल्या बोलण्याला काही अर्थ नाहीये..

या बोलायच्या गोष्टी नाहीत, त्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य त्यांनी सुद्धा केली नाही पाहिजेत. त्यांनी ग्रेसफुली रिटायर व्हावं किंवा काही तरी पॉझिटीव्ह काम करायला हवं, अशी आमची अपेक्षा आहे, असेही आमदार भोसले यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT