Satara DCC Bank : साताऱ्यात पुन्हा झेडपीचाच डाव? : जयकुमार गोरेंच्या घोषणेने मकरंदआबा अन्‌ शंभूराज देसाईंना थेट इशारा...

Jaykumar Gore Announcment : सातारा डीसीसी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांच्या घोषणेमुळे राजकीय समीकरणांना वेग आला आहे. महायुतीतील नेत्यांमध्ये पुन्हा मतभेदाची शक्यता असून जिल्हा परिषद निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची चर्चा आहे.
Makarand Patil-Shambhuraj Desai-Jaykumar Gore-Shivendraraje Bhosale
Makarand Patil-Shambhuraj Desai-Jaykumar Gore-Shivendraraje BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Satara, 22 August : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बॅंकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा महत्वपूर्ण घोषणा केली आहे. गोरे यांच्या घोषणेमुळे साताऱ्यात पुन्हा जिल्हा परिषद निवडणुकीची डाव रंगण्याची चर्चा सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री मकरंद पाटील आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना इशारा मानला जात आहे. त्यामुळे सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महायुतीचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज (ता. २२ ऑगस्ट) सातारा जिल्हा परिषदेच्या कामाचा आढावा बैठकीसाठी उपस्थित होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना गोरे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाष्य केले.

ते म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही जिल्ह्यातील महत्त्वाची संस्था आहे. ही निवडणूक आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून लढणार आहोत. त्यासाठी महायुतीमधील सहकारी (शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस) सोबत आले तर त्यांचा विचार करु. मात्र, भारतीय जनता पक्ष ही निवडणूक शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली लढणार आहे, हे निश्चित आहे.

Makarand Patil-Shambhuraj Desai-Jaykumar Gore-Shivendraraje Bhosale
Sugar Price Hike : अमित शाह, प्रल्हाद जोशी जवाब दो...! 48 लाख टन साखर गेली कुठे? : राजू शेट्टी

दरम्यान, गोरे यांनी सोलापूरमध्ये बोलतानाही सातारा जिल्हा बॅंकेचा गुलाल उधळूनच सोलापूरमध्ये जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी येणार आहे, असे सांगितले होते. तसेच, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे, असेही म्हटले हेाते. त्यावरून त्यांनी विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाई यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शिवेंद्रराजेंनी पालकमंत्रिपदाचे वाटप झालेले आहे, त्यामुळे आता पालकमंत्रिपद बदलले जाणार नाहीत, असे सांगून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

गोरेंच्या त्या विधानामुळे निर्माण झालेले राजकीय वातावरण शांत होण्याच्या आधीच त्यांनी पुन्हा एकदा मित्रपक्षांना यायचे असेल तर या नाही तर तुमच्याशिवाय, अशीच भूमिका मांडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे साताऱ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची भाजपशी पुन्हा टक्कर होणार का, याची उत्सुकता आहे.

Makarand Patil-Shambhuraj Desai-Jaykumar Gore-Shivendraraje Bhosale
Sugar Mill Action : एफआरपी थकविणाऱ्या सोलापुरातील 6 कारखान्यांना दणका : महाडिक, साठे, काडादी, आवताडे, शिंदेंच्या कारखान्यांचा समावेश

गोरे म्हणाले, सातारा जिल्हा सहकारी बॅंकेची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीबाबत सर्वांनी एकत्र बसून विचार करणे आवश्यक आहे. ही निवडणूक भाजप मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे. निवडणुकीत सहकारी पक्ष सोबत आले तरीही त्यांचा विचार करु.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com