Prithviraj Chavan-Prakash Ambedkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan News : '...तो महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्काच' ; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप!

Umesh Bambare-Patil

Prithviraj Chavan on Chhatrapati Shivaji Maharaj statue : 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून भाजपने राजकीय इव्हेंट केला. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळा उद्घाटनाचा घाट घालून लोकसभेसाठीही इव्हेंट केला. मात्र प्रत्यक्षात पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळेच तो कोसळला. तो महाराष्ट्राच्या अस्मितेलाच धक्काच आहे. त्या विरोधात राज्यभर आम्ही आंदोलन करणार आहोत. '

तसेच, मालवणच्या घडलेल्या साऱ्या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करावी. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली आहे.

मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा येथे पुतळा कोसळला. त्या घटनेवरून सरकारच्या विरोधात आज सातारामधी दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसतर्फे आंदोलन झाले. त्यामुळे पोलिस व प्रशासनाची धावपळ उडाली. त्या परिसरात वाहतूक कोंडीही झाली होती. आमदार पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले, 'मालवण पुतळा उभारण्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होते. त्या पुतळ्याच्या माध्यमातून भाजपला लोकसभा निवडणुकीआधी इव्हेंट करायचा होता. त्या भागातील राज्यातील मते मिळविण्याची खटपट होता. मात्र असा निकृष्ट काम केल्याने आज त्याचा विपरीत परिणाम दिसतो आहे.'

'त्यामुळे भाजपने(BJP) महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ केला आहे. तो त्यांना निश्चित महागात पडणार आहे. आम्ही त्या विरोधात राज्यभर आंदोलन करणार आहोत. आमचे काही सहकारी त्या परिसराची पाहणी करायला गेले आहेत. ते परतले की, आंदोलनाची पुढची दिशा निश्चीत स्पष्ट करण्यात येईल.'

नौदल दिन दिवशीच तो पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या उपस्थितीत उभा करण्याची घाई केली गेली. मुळ निविदेत किती दिवसांचा कालावधी होता. त्या दिवसाआधी काम पूर्ण झाले का, त्यासाठी कसले साहित्य वापरले, त्याचे साहित्य गंजले कसे, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्याचा जाब सरकारला विचारलाच पाहिजे.

मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पडल्याने राज्याच्या अस्मितेवर तो घाला आहे. त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याने भ्रष्टाचारी सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीतही भ्रष्टाचार झाला आहे. वास्तविक नौदलाचा सल्ला झुगारून पत्र्याचा पुतळा उभारला गेल्याची आमची माहिती आहे. तो पुतळा नौदलाच्या जागेत असला तरी त्याची जबाबादारी राज्य शासनाकडे आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री शिंदे, बांधकाम मंत्री व राज्याचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) काय करत होते, याचाही खुलासा होण्याची गरज आहे.

पुतळा उभारण्याचा कालावधी किती होता, स्ट्रक्चर कुणी आणि का बदलले याचीही माहिती जनतेला देण्याची गरज आहे. या साऱ्या प्रकाराची सर्वोच्च पातळीवर चौकशी झाली पाहिजे. नौदल जबाबदार असेल तर त्याची नैतिक जबाबादारी स्वीकारून संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी त्याची जबाबदारी स्विकारली पाहिजे. असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT