Radhanagari VidhanSabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत प्रचंड संघर्ष निर्माण झाला आहे. उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी झाल्यानंतर भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी राजीनामा देत पक्षाला सोडिचिठ्ठी दिली आहे.
तसेच त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले असून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देसाई यांनी नुकताच कार्यकर्त्यांचा मेळावा घेत पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली आहे.
कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या मेळाव्यात राधानगरी विधानसभा मतदारसंघात राहुल देसाई यांनी कोणत्या पक्षातून लढवायची? कोणत्या पक्षात प्रवेश करायचा? याचे सर्वाधिकार देसाई यांना देण्याचा एकमुखी ठराव केला गेला.
आगामी विधानसभेसह(VidhanSabha Election) सर्व निवडणुकीत माजी आमदार बजरंग देसाई यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण वाटचालीत देसाई यांच्या पाठीशी ठाम रहाण्याचा निर्णय राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांनी केला. शिवाय भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सामुदायिक राजीनामे देण्याची घोषणाही केली.
याप्रसंगी राहुल देसाई यांनी बोलताना, मोठ्या अपेक्षेने व कार्यकर्त्यांच्या हितासाठी आपण भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. पण तेथे आपला भ्रमनिरास झाला. त्यामुळे आपण कार्यकर्ते हेच बळ मानून देसाई गटाच्या भविष्यातील वाटचालीकरिता आपण भाजपाच्या(BJP) जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. कार्यकर्ताच्या हिताचा विचार करून वाटचाल करणार आहोत, तालुक्यातील विकासात्मक राजकारणापेक्षा अन्य बाबीना महत्व दिल्याने मतदारसंघातील बरेच प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. त्यांना न्याय देण्याची भूमिका घेवूया, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी प्रकाश कुलकर्णी म्हणाले की, भाजपामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची प्रचंड घुसमट होत होती.आमदारकीच्या काळात या मतदारसंघाला विकासाभिमुख करण्याकरिता व विकासाचा वारसा पुढे चालवण्यासाठी देसाई जो निर्णय घेतील त्यांचे स्वागतच असेल. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती विरोधात देसाई यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून विजयी करण्याचा संकल्प करण्यात आला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.