BJP News : आगामी स्थानिकच्या निवडणुकांच्या आधीच भाजपच्या प्रदेश समितीने जिल्हा स्तरावर मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे मंडल नियुक्त्या पार पडल्या असून आता जिल्हाध्यक्षांच्याही नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या आठोवड्याभरात त्या होतील. पण आता सांगली जिल्ह्यात ग्रामीणसाठी होणाऱ्या प्रक्रियेत दोन सख्खा चुलत भावांमध्ये चुरस निर्माण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे कडेगावचे रण तापले आहे. ही निवड दोन देशमुखांसह चंद्रकांत पाटलांसाठी परीक्षा ठरणार आहे.
भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी मंगळवारी (ता.29) शिरढोण येथे प्रक्रिया पार पडली. यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठकही झाली.
या बैठकीत शहराप्रमाणेच सांगली ग्रामीणसाठी प्राधान्यक्रमाने मतदार घेण्यात आले. यावेळी विलास काळेबाग, मिलिंद कोरी यांच्या नावाचा समावेश इच्छुकांमध्ये असल्याचे समोर आले आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे या निवड प्रक्रियेत माजी आमदार तथा माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या देखील नावाचा समावेश आहे. तर या निमित्ताने पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख हे चुलत भाऊ अध्यक्षपदासाठी आग्रही असल्याने आता चुरस वाढली आहे.
लोकसभेवेळी पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांच्या वाटा वेगळ्या झाल्या होत्या. संग्राम देशमुख यांच्यावर एक गट नाराज असल्याचे बोलले जाते. संजयकाका पाटील यांना विरोध करण्यासाठी पृथ्वीराजबाब देशमुख यांना समोर आणल्याचेही आता बोलले जात आहे. एका गटाने आधीच पृथ्वीराजबाब देशमुख यांना ग्रामीण जिल्हाध्यक्ष किंवा विधानपरिषदेवर त्यांना पाठवण्याची मागणी केली होती. पण त्यांचा विचार पक्ष पातळीवर झाला नाही. मात्र पृथ्वीराजबाब देशमुख यांनी त्यांच्या काळात, जिल्हा बँक, जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकांमध्ये भाजप मजबूत करण्याचे काम केल्याचे म्हणत आहे.
संग्राम देशमुख यांच्या जमेची बाजू पाहताना, त्यांच्याबद्दल भाजपमध्ये चांगले वातावरण असून त्यांनी जिल्हा परिषद, जिल्हा बँकेत भाजपची ताकद वाढवली होती. त्यामुळे त्यांच्याही नावाला पसंती दिली जात असून त्यांना जिल्हाध्यक्ष करावे अशी मागणी केली आहे.
पण फक्त दोन देशमुख रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत म्हणून पक्ष पातळीवर निर्णय होणार नसून इच्छुक असणाऱ्या विलास काळेबाग, मिलिंद कोरी यांच्याबाबतही चाचपणी केली जाणार आहे. यासाठीच आजी-माजी आमदारांसह विद्यमान दोन्ही जिल्हाध्यक्ष, पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हा सरचिटणीस आणि पदाधिकाऱ्यांनी आप आपले प्राध्यान्यक्रमांक दिले असून ते आता पाकिटबंद झाले आहेत.
तर या पाकिटबंदमध्ये कोणाचे नाव आहे. प्रदेशाध्य चंद्रशेखर बावणकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण कोणाचे नाव अंतिम करतात हे काहीच दिवसात समोर येणार आहे. तर दोन देशमुखांमध्येही कोणाचे वजन जास्त आहे हे देखील समोर येणार आहे. तर दोन देशमुख असोत की इतर इच्छुक यामध्येही संधी देताना पक्ष चंद्रकांत पाटील, विद्यमान आमदारांनाही कितपत विचारात घेत हे देखील आता समोर येणार आहे. कोणाच्या शब्दाला किती वजन आहे हे देखील स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.