Sangli BJP Politics : सांगलीत भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत विद्यमानांची चलती; ग्रामीणसाठी रस्सीखेच

Election of BJP district president : सांगली जिल्ह्यातील भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेस सोमवारी (ता.28) सुरूवात झाली. तर मंगळवारी (ता.29) ग्रामीणबाबत महत्वाची बैठक पार पडली. ज्यात प्राधान्यक्रमांची नावे पाकिटात बंद.
Election of BJP Sangli district president
Election of BJP Sangli district presidentsarkarnama
Published on
Updated on

Sangli BJP Politics : आगामी स्थानिकच्या अनुशंगाने भाजपकडून मंडळ अध्यक्षांच्या निवडीकरण्यात आल्या आहेत. सांगलीत 4 शहर जिल्हा मंडल अध्यक्षांसह सांगली ग्रामीण मंडल अध्यक्ष म्हणून संतोष सरगर अशा पाच जणांची निवड झालीय. तर मिरज येथील 4 मंडल अध्यक्षांची देखील निवड करण्यात आलीय. यानंतर भाजपच्या शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेस देखील सुरूवात झाली. सोमवारी (ता.28) आणि मंगळवारी (ता.29) ग्रामीणबाबत प्रक्रिया पार पडली.

भाजप शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मिरज रोडवरील संपर्क कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी पक्षनिरीक्षक माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील आणि नितीन शिंदे तसेच विद्यमान दोन्ही जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा सरचिटणीस, महिला, युवा आणि मागासवर्गीय या तीन मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशा सुमारे 27 जणांना मतांचा अधिकार देण्यात आला होता.

या 27 पदाधिकाऱ्यांकडून एक ते तीन अशा प्राधान्यक्रमानुसार बंद पाकिटात नावे घेण्यात आली. तसेच हाळवणकर यांनी वैयक्तीक संवादही साधला. ही निवड प्रक्रिया आणखी काही दिवस चालणार असून त्यानंतरच जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर होणार आहेत. पण ही नावे अंदाजे 4 मे किंवा 5 मे रोजी जाहीर होतील अशीही शक्यता आहे.

Election of BJP Sangli district president
Ichalkaranji BJP Politics : आवाडे-हळवणकरांची भांडणं काही केल्या मिटेनात; आजी-माजी आमदारांच्या वादाने भाजपला सुधरेना

शहर जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत विद्यमान अध्यक्ष प्रकाश ढंग यांचेही नाव असून ते याआधी दीड वर्षाचा कालावधी पुर्ण झाला आहे. ढंग यांच्याशिवाय जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, पृथ्वीराज पवार, स्वाती शिंदे, पांडुरंग कोरे, संगीता खोत, पृथ्वीराज पाटील हे देखील इच्छुक आहेत.

दरम्यान ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी (ता.29) शिरढोण येथे बैठक झाली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसरकर, माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी आमदार सुभाष देशमुख हे देखील पक्ष निरीक्षक म्हणून उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुकांच्या नावांचा प्राधान्यक्रम बंद पाकिटाद्वारे घेतला गेला. जो आता प्रदेश कार्यकारिणीकडे अहवाल पाठवून दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या निवडीची घोषणा केली जाईल.

ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम सिंह देशमुख यांचे नाव चर्चेत आहे. तसेच माजी आमदार पृथ्वीराजबाबा देशमुख, विलास काळेबाग, मिलिंद कोरी देखील इच्छुक असल्याचे समोर आले आहे. पण आता आजी माजी आमदार, विद्यमान दोन्ही जिल्हाध्यक्ष, पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हा सरचिटणीस, महिला व युवा मोर्चा तसेच मागासवर्गीय मोर्चाचे पदाधिकारी अशा 27 जण कोणाला पसंती क्रम देतात आणि प्रदेश पातळीवर कोणाच्या नावाचा विचार होतो याची जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Election of BJP Sangli district president
BJP Politics : भाजप काँग्रेसचा कित्ता गिरवून नागपुरात भाकरी फिरवणार? अध्यक्षपदासाठी महिला नेत्याचे नाव आघाडीवर

भाजपमध्ये अस्वस्थता

मंडळ अध्यक्ष निवडीवेळी युवकांना प्राधान्याने पुढे आणण्यात आले असून काही जाणत्यांना बाजूला करण्यात आले होते. यामुळे सध्या जिल्ह्यात काही प्रमाणात अस्वस्थता असून मंडल निवडीमध्ये झालेली रिंग चर्चेचा विषय ठरला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com