Sangli, 14 March : आटपाडी तालुक्यातील पहिल्या आयपीएस तरुणाची भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आमदार पडळकर यांनी स्वतः हातात बादली घेऊन बाजारपेठेत नागरिक आणि व्यापाऱ्यांना साखर वाटली. आटपाडीतील धनगर समाजातील या सुपुत्राच्या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
घरात आठराविश्व दारिद्रय, लहानपणीच वडिल वारलेले याहीही परिस्थितीत आटपाडी (Atpadi) तालुक्यातील मिटकी गावचा प्रवीण उत्तम कोळपे हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. या परीक्षेत त्याने ५४ वी रॅंक मिळवत ह्या यशाला गवसणी घातली आहे.
यूपीएसीतील या यशाबद्दल आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar ) यांनी प्रवीण कोळपे याची आटपाडीतून हत्तीवर बसून मिरवणूक काढली आहे. आटपाडीतील बसस्थानक ते पोलिस ठाणे चौकापर्यंत शहरातील बाजारपेठेतून ही मिरवणूक काढण्यात आली आहे. या यशाबद्दल आमदार पडळकर यांनी स्वतः हातात बादली घेऊन बाजारपेठेत व्यापारी, नागरिकांना साखर वाटप केली.
आमदार पडळकर म्हणाले, दुष्काळी आणि विस्थापितांचा तालुका म्हणून राज्यात आटपाडीची ओळख आहे. धनगरबहुल या आटपाडीत मेंढपाळांची संख्या जास्तीची राहिलेली आहे, त्यामुळे आमच्या पहिल्या पिढीचं शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं. प्रतिकूल परिस्थिती असली तरी आमची दुसरी पिढी शिक्षणाच्या बाबतीत सतर्क आहे.
आमच्या मिटकी गावच्या प्रवीण कोळपे यातरुणाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, वडिल वारलेले...आई आणि आजी शेतात काम करणाऱ्या... अशा कुटुंबातील मुलगा आज आयपीएस होत आहेत, याचा सर्व आटपाडीकरांना आनंद होत आहे. त्यामुळे आटपाडीकरांनी प्रवीणची हत्तीवरून मिरवणूक काढायची असं ठरवलं होतं. नव्या पिढीतील तरुणांना कोणत्याही परिस्थितीत यश कसं मिळवायचं, हे प्रवीण एक उदाहरण त्यांच्यासमोर असणार आहे, असेही गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले.
उपेक्षित समाजाचा राजकीय आणि प्रशासनातील टक्का वाढावा, यासाठी नवीन मुलं मेहनत घेत आहेत. त्यातूनच आज प्रवीण कोळपेच्या माध्यमातून आटपाडीस पहिला आयपीएस मिळाला आहे, याचा अभिमान आम्हा सर्व आटपाडीकरांना आहे. नव्या पिढीतील तरुणांना प्रेरणा मिळावा, अशी आमची भूमिका आहे, असे आमदार पडळकर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.