Khatav Politic's : सभापतिपद राखणारे जयकुमार गोरे उपसभापतिपद सहकारी आमदारांच्या मतदारसंघात देणार?

Khatav Panchayat Samiti Sabhapati : सातारा जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीपूर्वी राजकीय हालचाली वेगात आहेत. खटावमध्ये वनिता दुबळे सभापती होणार निश्चित असून उपसभापतीपदासाठी घोरपडे व शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे.
Mahesh Shinde-Jaykumar Gore-Manoj Ghorpade
Mahesh Shinde-Jaykumar Gore-Manoj GhorpadeSarkarnama
Published on
Updated on

Vaduj, 14 March (आयाज मुल्ला ) : सातारा जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापतींची निवड येत्या सोमवारी (ता. १६ मार्च) होणार आहे, त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंचायत समित्यांमध्ये महायुतीचा फॉर्म्युला दिसणार की तीनही पक्ष स्वतंत्र असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या मतदारसंघातील खटाव पंचायत समितीचे सभापतिपद हे अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे, त्यामुळे गोरे गटाच्या वनिता दुबळे सभापती होणार, हे निश्चित आहे. मात्र, उपसभापती हे भाजप आमदार मनोज घोरपडे गटाला की शिवसेना आमदार महेश शिंदे गटाला मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे.

खटाव पंचायत समितीच्या (Khatav Panchayat Samiti) निवडणुकीत भाजपने १४ पैकी ८ जागा पटकावून पंचायत समितीवर वर्चस्व मिळविले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागा जिंकल्या आहेत. वनिता दुबळे, शशिकांत रोमण, हणमंतराव बोटे, प्रसाद जुगदर, डॉ. प्रगती कोकाटे, वैशाली मोरे, रेश्मा शेडगे, अनिता कोळी असे भाजपचे आठ सदस्य निवडून आले आहेत, तर मनोज देशमुख, संग्राम कदम-पाटील, शुभम शिंदे, महेश वाघ, श्यामली साळुंखे, स्नेहल जाधव असे राष्ट्रवादीचे सहा सदस्य निवडून आले आहेत.

पंचायत समितीचे सभापतिपद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने या पदासाठी भाजपच्या (BJP) कातरखटाव गणाच्या सदस्या वनिता दुबळे या विजयी झाल्या आहेत. त्यामुळे सभापतिपदी दुबळे यांची निवड निश्चित आहे. शिवाय बहुमत असल्याने उपसभापतीही भाजपचाच होणार, हे निश्चित मानले जात आहे.

खटाव-माण, खटाव-उत्तर कऱ्हाड आणि खटाव-कोरेगाव हे तीन विधानसभा मतदारसंघ खटाव पंचायत समितीशी निगडित आहेत, त्यामुळे कोणत्या विधानसभा मतदार संघातील व कोणत्या नेत्याच्या कार्यकर्त्याला पहिल्यांदा संधी दिली जाणार याबाबत औत्सुक्य आहे.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माण विधानसभा मतदारसंघातील वनिता दुबळे, बोटे, जुगदर, वैशाली मोरे हे पाच सदस्य आहेत, तर डॉ. कोकाटे या आमदार मनोज घोरपडे यांच्या कऱ्हाड उत्तर मतदारसंघातील, तर आमदार महेश शिंदे यांच्या कोरेगाव मतदारसंघातील रोमण, रेश्मा शेडगे हे दोन सदस्य आहेत.

Mahesh Shinde-Jaykumar Gore-Manoj Ghorpade
Patan Politic's : देसाई गटाचा विजयी वारू अखेर पाटणकरांनी रोखला; राजकीयदृष्ट्या संवेदनशील संस्थेत दणदणीत विजय

माण मतदारसंघात सभापतिपद असल्याने सत्तेचा समतोल साधण्यासाठी कोरेगाव अथवा कऱ्हाड उत्तर मतदारसंघातील सदस्याला उपसभापतिपदाची संधी दिली जाऊ शकते. त्यादृष्टीने कऱ्हाड उत्तर मतदारसंघाबरोबरच खटाव, माण तालुक्यांत चांगला संपर्क असलेल्या बाजार समितीचे माजी सभापती सी. एम. पाटील यांच्या कन्या व म्हासुर्णे गणाच्या सदस्या डॉ. प्रगती कोकाटे-पाटील यांना संधी मिळू शकते.

याशिवाय निमसोडमधील प्रस्थापित नेतृत्वांना शह देण्याच्या दृष्टीने वैशाली मोरे यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो. सभापतिपद महिलेकडे असल्यामुळे उपसभापतिपदी पुरुष सदस्याची निवड व्हावी, असाही विचार ऐनवेळी पुढे येऊ शकतो. यामध्ये श्री. रोमण, श्री. बोटे, श्री. जुगदर यांमध्ये कोणाला संधी दिली जाणार याबाबत उत्सुकता आहे.

Mahesh Shinde-Jaykumar Gore-Manoj Ghorpade
Sunetra Pawar Satara Tour : सुनेत्रावहिनींचा पवारांच्या बड्या नेत्याला निरोप; साताऱ्यातील नव्या राजकीय घडामोडींचे संकेत

उपसभातिपदाचा निर्णय चर्चेतून होणार

उपसभापतिपदासाठी भाजपतील सदस्यांमध्ये मोठी चुरस आहे. त्यामुळे उपसभापतिपदाची कोणाला पहिली संधी द्यायची याबाबत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम ही नेतेमंडळी आपापसांत चर्चा करून उपसभापतिपदाचा तिढा सोडवतील, अशी शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com