Karad City Flex
Karad City Flex karad reporters
पश्चिम महाराष्ट्र

एकवेळ पाण्याचा कऱ्हाडकरांकडून निषेध; चौका चौकात झळकले फ्लेक्स...

- सचिन शिंदे

कऱ्हाड ः कऱ्हाडकर अन्याय सहन करणार नाहीत, आपण कऱ्हाडच्या जनतेचे सेवक आहात मालक नाही, पाणी पुरवठा योजनेला अचानक तोटा का झाला, असे प्रश्नार्थक फ्लेक्स लावून कऱ्हाडकरांनी आज पहाटेच पालिकेच्या एक वेळ पाणी पुरवठ्याचा निषेध केला आहे. कऱ्हाडला चौका चौकात निषेधाचे फ्लेक्स झळकले आहेत.

शाहू, दत्त चौकासह शहरातील चौका चौकात लावलेल्या फ्लेक्सची चर्चा आहे. कऱ्हाडला चौदा वर्षापासून चोवीस तास पाणी योजना गाजते आहे. त्या पाणी पुरवठा योजनेचा पत्ता नाही. तोच पालिकेने एकवेऴ पाणी पुरवठा करण्याचा घेतलेल्या निर्णयाचा आगळ्या वेगऴ्या पद्धतीने कऱ्हाडला पहाटे निषेध झाला.

कऱ्हाडकर साखर झोपेत असतानाच शहरातील चौका चौकातील फ्लेक्सने साऱ्यांचे लक्ष वेधले. आपण कऱ्हाडचे सेवक आहात, मालक नाही, अन्यायकारक निर्णय कऱ्हाडकर सहन करणार नाहीत, पाणी पुरवठा योजना अचानक तोट्यात का गेली, त्याचा निषेध करत एक सुज्ञ नागरीक म्हणून गांधीगिरी स्टालाईने निषेध केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT