तोटा भरून काढण्यासाठी कराड पालिकेचा फतवा; नागरीकांना केवळ एकवेळ पाणी...

कराड पालिकेने Karad Palika घेतलेल्या उपायामुळे वार्षिक दोन कोटी रुपयांचा तोटा two cr loss भरून काढणे शक्य होणार आहे. एकवेळ पाणीपुरवठा केल्यास तोटा साडेचार कोटींवरून अडीच कोटींपर्यंत घटणार आहे.
Ramakant Dake, Ceo Karad palika
Ramakant Dake, Ceo Karad palikakarad reporter
Published on
Updated on

कऱ्हाड : कराड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेला दरवर्षी होणारा साडेचार कोटींचा तोटा भरून काढण्यासाठी कराड शहरात दररोज दोन वेळा पाणीपुरवठा बंद करून तो एकवेळ (सकाळी) करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून (ता. ११) होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.

कराड शहरात अनेक वर्षांपासून सकाळी व सायंकाळी असा दोन वेळा पाणीपुरवठा होत आहे. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी योजनेचा तोटा भरून काढण्यासाठी पालिका प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात श्री. डाके म्हणाले, ''नगरपालिकेतर्फे सकाळी व सायंकाळी शुद्ध पाणीपुरवठा होत आहे. मात्र, पाणीपुरवठ्याची योजना अनेक वर्षांपासून तोट्यात आहे. पाणीपुरवठ्यासाठी पालिकेला वार्षिक आठ कोटींचा खर्च येत आहे. खर्चाएवढी मिळकत नाही.

Ramakant Dake, Ceo Karad palika
माझी वसुंधरा पुरस्कारात कराड पालिका राज्यात दुसरी

पाणीपट्टीच्या माध्यमातून साडेतीन कोटींची वार्षिक वसुली होते. त्यामुळे योजना साडेचार कोटी रुपये तोट्यात आहे. तोट्याच्या तुलनेत पाणीपट्टीही वाढवलेली नाही. मागील वर्षी नाममात्र ६० रुपयांची वाढ झाली. तरीही तोटा भरून निघत नव्हता. त्यामुळे अखेर एकवेळ पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. दोनवेळ पाणीपुरवठा करण्यासाठी नदीतून दोन वेळा उपसा करावा लागतो. त्या प्रक्रियेवर मोठा खर्च आहे. एकवेळ पाणीपुरवठा झाल्यास तो खर्चही आटोक्यात येईल. पाण्याच्‍या वापरावरही नियंत्रण येईल.

Ramakant Dake, Ceo Karad palika
स्वच्छ सर्वेक्षणात कराड, पाचगणी देशात अव्वल; सात शहरांना 'थ्री स्टार' रॅकिंग

सांडपाणी प्रक्रिया केंद्रावरही ताण कमी होऊन तेथील पाणी शुद्धीकरणाचाही ताण कमी होणार आहे. तोटा भरून काढण्यासाठी पाणीकर वाढवणे किंवा खर्च कमी करणे, असे पर्याय होते. त्यात नागरिकांवर पाणीपट्टी वाढीचा बोजा न टाकता एकवेळचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने घेतलेल्या उपायामुळे वार्षिक दोन कोटी रुपयांचा तोटा भरून काढणे शक्य होणार आहे. एकवेळ पाणीपुरवठा केल्यास तोटा साडेचार कोटींवरून अडीच कोटींपर्यंत घटणार आहे.''

Ramakant Dake, Ceo Karad palika
कराड मुख्याधिकायांच्या नगरसेविकांना नोटीसा : नातेवाईकांचा पालिका कारभारात हस्तक्षेप

कराड शहरात सकाळी, सायंकाळचा पाणीपुरवठा होत होता. मंगळवार व शनिवारचा सायंकाळी होणारा पाणीपुरवठा बंद होता. आता दररोजचा सायंकाळी होणारा पाणीपुरवठा बंद केला जाईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा.

- रमाकांत डाके, मुख्याधिकारी, कऱ्हाड

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com