Maan Maratha Morcha sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan, Khatav Maratha Protest News : जालन्यातील घटनेचा निषेध; सोमवारी माण, खटाव बंदची मराठा समाजाची हाक...

Umesh Bambare-Patil

Maan, Khatav Marath Protest News : अंतरवाली सराटी (जि. जालना) येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने सोमवारी (ता. ४) माण व खटाव तालुके बंदची हाक दिली आहे. तसेच यावेळी निषेध मोर्चा सुध्दा काढण्यात येणार आहे.

अंतरवाली (सराटी, जि. जालना) येथे मराठा Maratha Reservation समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस Police लाठीमाराच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. या लाठीमाराच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने खटाव व माण Maan तालुक्यात (जि.सातारा) आंदोलन झाले.

प्रशासनाच्या संतापजनक कारवाईचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा माण तालुका यांच्या वतीने सोमवारी माण तालुका बंदचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी सिध्दनाथ मंदिर ते तहसीलदार कार्यालय असा निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून माण तालुक्यातील सर्वांनी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सिध्दनाथ मंदिर दहिवडी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी माण तालुका बंदचे आवाहन करण्यात आल्यामुळे सोमवारचा दहिवडी येथील आठवडा बाजार बंद राहणार आहे.

तसेच खटाव तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी (ता.४) खटाव तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अजय कोकाटे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बाजार समितीचे उपसभापती विजय शिंदे, माजी नगरसेवक शहाजीराजे गोडसे, विनोद शिंदे, प्रशांत जाधव, दयानंद पोळ, निलेश गोडसे, युवराज पाटील, बाबू गोडसे, सुरज देशमुख, धनाजी गोडसे, अमोल घाडगे, निलेश जाधव, विजय गोडसे, अजय खुस्पे, संतोष कोकरे, सोमनाथ माने आदी उपस्थित होते.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT