Maan Political News : जयकुमार गोरेंची रोहित पवार, शरद पवारांवर टीका; त्यांनी दुष्काळावर बोलावे हे हस्यास्पद...

Jaykumar Gore टंचाई आढावा बैठकीनंतर आमदार जयकुमार गोरे यांच्याशी सातारा शासकिय विश्रामगृहात पत्रकारांनी संवाद साधला.
Jaykumar Gore, Rohit Pawar, Sharad Pawar
Jaykumar Gore, Rohit Pawar, Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Maan Political News : माण, खटावमध्ये सगळ्यांनीच लक्ष केंद्रीत केलंय ही जयकुमार गोरेंची ताकत असून यातून हा मतदारसंघ राजकारणाचा केंद्र बिंदु झाल्यास तो विकासाचा केंद्र बिंदू होईल, असा विश्वास व्यक्त करुन ज्यांनी हा भाग कायम दुष्काळी राहावा, अशी व्यवस्था केली त्यांनी दुष्काळाबद्दल बोलावे हेच हस्यास्पद आहे, अशा शब्दात आमदार जयकुमार गोरे यांनी खासदार शरद पवार व आमदार रोहित पवार यांच्या टीकेची खिल्ली उडवली.

टंचाई आढावा बैठकीनंतर आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांच्याशी सातारा शासकिय विश्रामगृहात पत्रकारांनी संवाद साधला. यावेळेस प्रचंड दुष्काळ पडण्याची चिन्हे असून खटाव, माण Maan, कोरेगाव, खंडाळा, येथे टॅंकर सुरु आहेत. त्यानुसार आजच्या बैठकीत मागेल त्यांना दोन दिवसात टॅंकर देणे, चारा छावणी ऐवजी चारा डेपोची व्यवस्था करण्याचा निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

दहिवडीच्या सभेत आमदार रोहित पवारांनी पालकमंत्री दुष्काळी भागात फिरकले नसल्याची टीका केली होती. त्याबाबत आमदार गोरे म्हणाले, रोहित पवार व खासदार शरद पवारांच्या तोंडून हे वक्तव्य शोभत नाही. ज्यांनी या भागात कायम दुष्काळ राहावा, अशी व्यवस्था केली त्यांनी दुष्काळाबद्दल बोलावे हेच हस्यास्पद आहे. रोहित पवार खूप छोटे असून त्यांना मोठी स्पेस मिळाल्याने ते त्याचा वापर करत असल्याची टीका गोरेंनी केली.

सर्वांनीच माण खटाव मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर आमदार गोरे म्हणाले, माण, खटावमध्ये अनेक गोष्टी घडत आहेत. त्यातून सर्वजण लक्ष देत असतील. पण आगामी काळात हा मतदारसंघ राजकारणाचा केंद्र बिंदू झाल्यास तो विकासाचाही केंद्र बिंदू होईल.या सगळ्यांना माणध्ये याव लागते हीच माझी ताकत आहे.

Jaykumar Gore, Rohit Pawar, Sharad Pawar
NCP Ajit Pawar News : अजित पवार गट म्हणतो राष्ट्रवादी आमचीच, कुंपणावरील कार्यकर्तेही आमच्याकडेच येणार !

तर घरातून बाहेर पडला नसता....

प्रभाकर देशमुख यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आमदार गोरे म्हणाले, मी गुंडगिरी केली तर देशमुख घरातून बाहेर पडला नसता. निवडणुकीत माझ्या गावांत त्यांचे बुथ असतात. त्यांना येथून मतेही पडतात. मी गुंडगिरी करावी, अशी त्यांची अपेक्षा असेल तर तसेही करु आपण, असा इशाराही गोरेंनी दिला.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com