Protests by electricity workers
Protests by electricity workers sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahavitaran Strike : वीज कर्मचाऱ्यांची निदर्शने; खासगीकरणाला विरोध...

Umesh Bambare-Patil

Satara News : विज उद्योगाचे खासगीकरण Privatization of power industry करणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ आजपासून विज कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला साताऱ्यातही Satara प्रतिसाद मिळाला. वीज कंपन्यात होणारा राजकिय हस्तक्षेप बंद करावा, वीज सुधारणा कायदा रद्द करावा, वीज कंपनी जनतेची नाही कुणाच्या बापाची अशी घोषणाबाजी करत कृष्णानगर येथील विज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. तसेच केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदवला.

वीज कंपन्यांच्या खासगीकरणाविरोधात वीज कर्मचाऱ्यांनी आजपासून तीन दिवस राज्यव्यापी संप पुकारला आहे. आज ८४ हजार कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. साताऱ्यातील विज वितरणच्या कृष्णानगर कार्यालयासमोर जमून जोरदार घोषणाबाजी केली. तसेच खासगीकरणास विरोध दर्शवत वीज सुधारणा कायदा रद्द करण्याची मागणी केली.

यावेळी बोलताना संघर्ष समितीचे नेते नाना सोनलकर म्हणाले, राज्याच्या हक्काचे उत्पन्नाचे साधन आदाणी कंपनीला देण्याचा घाट केंद्र व राज्य सरकाने घातला आहे. जनतेच्या मालकीचे हे वीज क्षेत्र असून ते खासगी मालकाच्या हातात गेल्यास ग्राहकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे विरोधात राज्यभरातून कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.जिल्ह्याच्या दुर्गम भागासह दुष्काळी तालुक्यातील काही भागात वीज गुल झाल्याने नागरीकांच्या संतप्त प्रक्रिया उमटल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT