Satara News : अजित पवारांच्या विधानावर भुजबळ म्हणाले, मी अभ्यास करुन बोलेन

Chhagan Bhujbal माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नायगांव या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळास आज भेट देऊन अभिवादन केले. यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal sarkarnama
Published on
Updated on

Naigaon News : छत्रपती शिवाजी महाराज हे गो ब्राम्हण प्रतिपालक होते. म्हणजेच ब्राम्हणांचे पालक मान्य आहे. पण, कुणबी, शिवा काशिद असेल दलित समाजाचे पालक नव्हते का, असा प्रश्न ज्येष्ठ नेते छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी उपस्थित करुन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलच्या वक्तव्यबाबत मी अभ्यास करून बोलेन, असे त्यांनी स्पष्ट केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नायगांव या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळास आज भेट देऊन अभिवादन केले. यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

भुजबळ म्हणाले, अजित पवारांच्या विधानावर मी आत्ता बोलणार नाही. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यामुळे आत्ता बोलणार नाही. मी अभ्यास करतोय. छत्रपती शिवाजी महाराज गो ब्राम्हण प्रतिपालक होते. म्हणजेच गो ब्राम्हण प्रतिपालक प्रमाणे ब्राम्हणांचे पालक मान्य आहे. पण कुणबी, शिवा काशिद असेल दलित समाजाचे पालक नव्हते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Chhagan Bhujbal
Naigaon : फुले दांपत्याने बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दिला...भुजबळ

मी ब्राम्हणांबद्दल बोलत नाही. पण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अनेक ब्राह्मणांनी मदत केली आहे तसेच विरोध ही केला. शिवाजी महाराजांसोबत वेगवेगळ्या जातीचे लोक होते. पण अभ्यास करून सांगेन असेही भुजबळ यांनी नमूद केले. दरम्यान, या वादात माध्यमांनाच जास्त इंटरेस्ट असल्याचे भुजबळांनी नमूद केले.

Chhagan Bhujbal
Satara News : सातारा मेडिकल कॉलेजमधील भंगार विक्रीचा मुद्दा विधानपरिषदेत; आता होणार चौकशी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com