Swabhimani Shetkari Sanghatana Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Swabhimani Shetkari Sanghatana : 'स्वाभिमानी'चं आंदोलन पेटलं; कोल्हापुरात ठिकठिकाणी जाळपोळ, कार्यकर्ते आक्रमक!

Raju Shetty News : आगामी काळात हे आंदोलन चिघळण्याची शक्यता दिसत आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : ऊसदरावरून आणि मागील हंगामातील चारशे रुपये परतावा द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून याची कोण दखल घेत नसल्याने अखेर दिवाळीतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊसदर आंदोलन पेटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या असून, आगामी काळात हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. शिवाय दोन दिवसांपूर्वी शट्टी यांनी दिवाळीनंतर आंदोलन काय असते? असा इशारा देत रस्त्यावरचा संघर्ष सुरू ठेवण्याचे संकेत दिले होते. काल वारणा आणि शिरोळ परिसरात आज्ञातांनी उसाची वाहने पेटवून दिली.

सोमवारी रात्री वारणा सहकारी साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अज्ञात लोकांनी पेटविला दिला. या घटना वठार पारगाव रस्त्यावरील चावरे फाट्याजवळ घटना घडली. सरकार व कारखानदार यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करू लागल्याने लोकांची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत, तर शिरोळ तालुका परिसरात ऊसदरावरून अज्ञातांनी श्री गुरुदत्त सहकारी साखर कारखान्याकडे जाणारा ऊस गाडी पेटवून दिली.

या वेळी शेतकऱ्याने ऊसदराबाबत आणि कारखानदारांच्या विरोधात घोषणाबाजी केली, तर शिरोळ तालुक्यातीलच अकिवाट येथे शेतकऱ्यांनी गुरुदत्त कारखाना येथे ठिय्या आंदोलन केले. तसेच कारखाना कर्मचारी आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.

कागल तालुक्यात शेतकरी आक्रमक -

कापशी खोर्‍यातील परिसरात मंत्री मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे, भाजपचे समरजितसिंह घाटगे यांच्या शाहू साखर कारखाना आणि बिद्री कारखान्याची ऊस वाहने रोखून त्यांची हवा सोडण्यात आली.

दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी कारखानदारांच्या विरोधात तालुकास्तरावर रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनामुळे ऐन दिवाळीत पोलिसांची धावपळ उडाली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT