Bandatatya Karadkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शालेय पोषण आहारात आणि मंदिरातही वाईन उपलब्ध करून द्या : बंडातात्या कराडकर

शासनाने सुपर मार्केट Super Market व किराणा माल दुकानात वाईन Wine विक्रीस परवानगी दिली आहे. यावरून बंडातात्यांनी Bandatatya महाविकास आघाडी Mahavikas aghadi सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : शासनाने मार्केट व किराणा माल दुकानात वाईन विक्रीस उपलब्ध करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. राज्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात एक धाडसी पाऊल उचलत ऐतिहासिक निर्णय या सरकरने घेतला आहे. आता शासनाने लहान मुलांची शाळेतील खिचडी बंद करून रोज थोडी थोडी वाईन दिली तर ते सदृढ युवक बनतील, तसेच भाजी मार्केट व मंदिरातही वाईन उपलब्ध करून द्यावी, म्हणजे भाविकांना दर्शन आणि तीर्थही मिळेल, असा उपहासात्मक टोला युवक मित्र बंडातात्या कराडकर यांनी लगावला आहे.

शासनाने सुपर मार्केट व किराणा माल दुकानात वाईन विक्रीस परवानगी दिली आहे. यावरून बंडातात्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. बंडातात्या म्हणाले, राज्य शासनाने मंत्री मंडळाच्या बैठकीत एक चांगला निर्णय घेतला आहे. प्रत्येक सुपर मार्केट व किराणा माल दुकानात वाईनची विक्री उपलब्ध करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. त्याबद्दल शासनाचे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महाराष्ट्राचे शहेनशहा शरद पवार यांचे हार्दिक अभिनंदन करतो.

राज्याच्या अमृत महोत्सवी वर्षात एक धाडसी पाऊल उचलत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तो सर्वसामान्यांच्या अतिशय कल्याणाचा आहे. आतापर्यंत सामान्य माणसाला दारूच्या उपलब्धतेसाठी दारूच्या दुकानात जावे लागत होते. आता येथून पुढे जावे लागणार नाही. किराणा दुकानात वाईन उपलब्ध होईल. यातून सर्व लोकांना दारूचे व्यसन लागून त्याचे दुष्परिणाम होण्यासाठी चांगली मदत होईल.

अगोदरच कोरोनाचे भूत जनतेच्या मानगुटीवर बसवले आहे. आता या भयभीत समाजाला आत्महत्येकडे जाण्यासाठी वाईनच्या उपलब्धतेचा चांगला उपयोग होईल. शासनाने यापुढे जात भाजी मार्केटमध्ये वाईन उपलब्ध केली तर चांगला प्रचार होईल. तसेच दूध व पेपर वाटप करणाऱ्यांच्या माध्यमातून दारू उपलब्ध करून द्यावी. तसेच लहान मुलांच्या शाळेतील खिचडीचा खाऊ बंद करून रोज थोडी थोडी वाईन दिली तर ती मुलं सुदृढ युवक बनतील.

यासोबतच मंदिरातही दारू उपलब्ध केली तर भाविकांना दर्शन व तीर्थही मिळेल. मी या सरकारचे हार्दिक अभिनंदन करत असून महाराष्ट्रातील जनतेने राज्य शासनाच्या या धाडशी निर्णयाचे जल्लोषात स्वागत करावे. रोषणाई, सडे रांगोळे घालून स्वागत करावे. असे हे समाज घातकी सरकार लवकरच रसातळाला जाओ, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT