मुंबई : राज्यातील धनगर समाजाच्या विकासासाठी १००० कोटी रुपयांची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेसाठी १० हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. या महामंडळाचे मुख्यालय अहमदनगर येथे असणार आहे, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले. (Provision of 1000 crores for Dhangar society: Headquarters of Goat-Sheep Mahamandal in the nagar)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प (Budget) जाहीर केला. आगामी निवडणुकीचा हंगाम पाहता त्यांनी नवनवीन घोषणांचा पाऊस पाडला. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी दंडवत घालून ‘टिकवावे धन, ज्याची आस कर जन’ या तत्वाला अनुसरून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेट मांडण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या घोषणांचा पाऊस पाडला.
धनगर समाजासाठीच्या मुख्य तरतुदी
- धनगर समाजासाठी १००० कोटी रुपये देणार
- २२ योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीमार्फत अंमलबजावणी
- महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
- महामंडळाच्या माध्यमातून १० हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
- या महामंडळाचे मुख्यालय अहमदनगर येथे असणार
- राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी
विविध समाज घटकांसाठी योजना
- असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ
- लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ
- गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ
- रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ
- वडार समाज : पैलवान (कै.) मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ
- ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत
- प्रत्येकी ५० कोटी रुपयांचा निधी देणार
विविध समाजघटकांच्या संस्थांसाठी भरीव निधी
- बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गिय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळांना भरीव निधी देणार
- संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळाला सुद्धा निधी उपलब्ध करून देणार
- छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानवविकास संस्थेचे (सारथी) नाशिक येथे विभागीय कार्यालय, सुसज्ज अभ्यासिका, मुला-मुलींचे वसतीगृह यासाठी ५० कोटी रुपये
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.