Ashok Sugar Factory

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

लोकसेवाने वाढविला प्रचाराचा नारळ : मुरकुटे व ससाणेंनी केली निवडणुकीची तयारी

भानुदास मुरकुटे व करण ससाणे यांनी पहिल्यांदाच एकत्र लोकसेवा पॅनल तयार करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामा ब्युरो

टाकळीभान ( जि. अहमदनगर ) : श्रीरामपूर तालुक्यातील अशोक नगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक करण ससाणे यांनी पहिल्यांदाच एकत्र लोकसेवा पॅनल तयार करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने दोघांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. Public Service Panel raises campaign coconut: Murkute and Sasane prepare for elections

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक निवडीसाठी 16 जानेवारीला मतदान प्रक्रिया होणार आहे. लोकसेवा मंडळातर्फे आज ( सोमवारी ) शंभू महादेव मंदिरात निवडणूक प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रेय मगर होते.

लोकसेवा मंडळातर्फे टाकळीभान गटातून सर्व साधारण मतदारसंघातून भानुदास मुरकुटे (कमालपूर), ज्ञानदेव पटारे (घोगरगाव ), नाव जाहीर केले नाही (बेलपिंपळगाव), ओबीसी मतदारसंघातून पूंजाहरी शिंदे (भोकर) महिला राखीव मतदार संघातून हिराबाई ज्ञानदेव साळुंके (टाकळीभान) व अनुसुचीत जाती जमाती मतदार संघातून यशवंत रणवरे (टाकळीभान) अशी सहा उमेदवारांची मंडळाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी घोषणा केली.

यावेळी दिगंबर बारस्कर, भारत भवार, सकाहरी शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ज्ञानदेव साळुंके, लहानभाऊ नाईक, रामकृष्ण पवार, बाबासाहेब बनकर, भाऊसाहेब कोकणे, दादासाहेब पटारे व सभासद, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी केले.

(स्व.) भास्करबाबा गलांडे यांच्यापासून ते आज 45 वर्षांपर्यंत टाकळीभान गटातून सर्वसाधारण मतदारसंघालाच उमेदवारी देण्याचा इतिहास आहे. मात्र स्थानिक कुरघोडीच्या राजकारणामुळे ती इतर मतदारसंघाला दिली. मी सर्वसाधारण मतदारसंघातून उमेदवारी करण्यास इच्छुक होतो. परंतु आपल्याला डावलण्यात आले. संघटनेकडून मला काहीही घेण्याची गरज नाही त्यामुळे मी शांत बसून राहणार असल्याची प्रतिक्रिया माजी संचालक मंजाबापू थोरात यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT