Pune Congress Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Politics : काँग्रेसमध्ये मोठी चुरस! पुणे शहरासाठी तब्बल २० जण इच्छुक, ग्रामीण भागातही १५ जणांची रेस

pune congress politics : काँग्रेस पक्षाने संघटन मजबूत करण्यासाठी कंबर कसली असून जिल्हा निहाय सध्या बैठका घेतल्या जात आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यातही स्वतंत्र जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Sudesh Mitkar

  1. काँग्रेसने पुणे जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी शिरूर आणि बारामतीसाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

  2. जिल्हाध्यक्ष पदासाठी शहरात 20 आणि ग्रामीण भागात 15 इच्छुकांमध्ये स्पर्धा सुरू आहे.

  3. पुढील 10 दिवसांत बैठका घेऊन अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.

Pune News : काँग्रेस पक्षाने पुणे जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. शिरूर आणि बारामती या दोन भागांसाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्याचा फॉर्म्युला राबवला जाणार आहे. येत्या १० दिवसांत नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा होणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकांनी दिली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार महाराष्ट्रात संघटन सृजन अभियान सुरू करण्यात आले आहे. याच अनुषंगाने पुणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस नियुक्त निरीक्षक योगेश एच. सी. प्रफुल्ल गुडदे पाटील, रामहारी रूपनवर, प्रशांत जगताप, अनंत मोहोद, विश्वजित हाप्पे आणि देविदास भन्साळी यांच्या उपस्थितीत बुधवारी काँग्रेस भवन येथे बैठक घेण्यात आली. या वेळी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण देखील उपस्थित होते.

निरीक्षक योगेश एच. सी. यांनी सांगितले की, शिरूर आणि बारामती या दोन भागांसाठी एक-एक जिल्हाध्यक्ष नियुक्त केले जाणार आहेत. शिरूर भागासाठी १० जण तर बारामती भागासाठी ५ जण असे एकूण १५ जण इच्छुक आहेत.

शिरूर जिल्हाध्यक्षपदासाठी शिरूर, जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ या तालुक्यांचा समावेश असेल. तर बारामती जिल्हाध्यक्षपदासाठी बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर आणि खडकवासला या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.

निरीक्षकांनी जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा चार दिवसांचा दौरा केला. प्रत्येक तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्जही मागवण्यात आले आहेत.

पुणे शहरातही मोठी चुरस

पुणे शहर काँग्रेससाठी देखील दोन शहराध्यक्ष नियुक्त करण्याचा फॉर्म्युला राबवला जाणार आहे. या दोन्ही पदांसाठी तब्बल २० जण इच्छुक असल्याचे समोर आले आहे. याबाबत शुक्रवारपासून पुढील सात दिवस प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकीनंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

FAQs :

1. काँग्रेसने कोणता नवीन निर्णय घेतला आहे?
शिरूर आणि बारामतीसाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

2. जिल्हाध्यक्षपदासाठी किती जण इच्छुक आहेत?
पुणे शहरात सुमारे 20 आणि ग्रामीण भागात 15 जण इच्छुक आहेत.

3. निवड प्रक्रिया कशी होणार आहे?
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बैठका घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल.

4. नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा कधी होईल?
पुढील 10 दिवसांत घोषणा होण्याची शक्यता आहे.

5. या निर्णयाचा उद्देश काय आहे?
पक्ष संघटन मजबूत करून राजकीय बळ वाढवणे हा मुख्य उद्देश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT