Maharashtra Politics Live : धक्कादायक! अकोला पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांचा बुलढाणा पोलिसांवर हल्ला

Political Breaking Live Marathi Headlines Updates : आज शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजीच्या राज्यासह देशभरातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया...
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

धक्कादायक! अकोला पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांचा बुलढाणा पोलिसांवर हल्ला

बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. तामगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलिसांमध्ये एकमेकांवर हल्ला केल्यानं खळबळ उडाली आहे. गुप्तधन प्रकरणाचा तपास करणयासाठी गेलेल्या बुलढाणा पोलिसांवर अकोला पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांनी हल्ला केला आहे. या हल्लात दोन कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

'प्रिया शिंदे यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवेळी सादर केलेला कुणबी दाखला वैधच...';आमदार महेश शिंदे 

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवेळी सादर केलेला कुणबी दाखला हा चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे देण्यात आला असल्याची ठपका ठेवत त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आता शिवसेनेचे कोरेगावचे आमदार आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांचे पती महेश शिंदे स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी प्रिया शिंदे यांच्या माहेरकडील वंशावळीत कुणबी हा उल्लेख असल्याने हा दाखला वैध असल्याचं म्हटलं आहे.

एमआयडीसीला एक रुपया भरण्यासाठी २० किमी प्रवास

जग २१व्या शतकात असताना एमआयडीसी मात्र ऑनलाईन पेमेंट सुविधा राबवण्यास असमर्थ ठरल्याने संताप व्यक्त होत आहे. डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रातील लिजवर राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना ठाण्यातील कार्यालयात एक रुपया वार्षिक भाडे भरण्यासाठी २० किमीचा नाहक प्रवास करावा लागत असल्याची तक्रार जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात मांडल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिल्यानंतर आठवड्याभरात या सुविधेबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

खरात प्रकरणात नवीन ट्विस्ट; CA ललित पोफळेची भोंदूबाबा विरोधात तक्रार

धार्मिक विधीच्या नावाखाली 8 कोटी 76 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची स्वतः ललित पोफळे यानं पोलिसांत तक्रार दिली आहे. SIT ने ललित पोफळे याची तक्रार नोंदवून घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. यामुळं अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. CA पोफळेची देखील अशोक खरात कडून फसवणूक झाल्याचं उघड. संस्थेवर एक CA असायला हवा, म्हणून पोफळेला शिवनिका संस्थेवर विश्वस्त म्हणून घेतल्याची माहिती.

Energy Security India : भारताचे पुढील तीन महिन्यांत 22 हजार मेगावॅट अतिरिक्त वीज निर्मितीचे सरकारचे लक्ष

"अखंड वीजपुरवठ्यासाठी सरकार सज्ज!" केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव पियुष सिंह यांनी माहिती दिली. रेल्वे आणि कोळसा मंत्रालयाशी समन्वयामुळे देशात 55 दशलक्ष टन कोळशाचा साठा उपलब्ध आहे. वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी औष्णिक आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रांत मोठी क्षमता वाढवली जात आहे.

Jalgaon Update : जळगाव नेहरू नगरातील बॉईज हॉस्टेलमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग

जळगाव शहरातील नेहरू नगर परिसरातील संदीपनी बॉईज हॉस्टेल इथं आज शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. ही आग हॉस्टेलच्या प्रवेशद्वाराजवळ लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली.

Russia Vs Ukraine : रशिया-युक्रेन युद्धात 32 तासांचा युद्धविराम

गेल्या चार वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात आज एक अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक घडामोड घडली. रशियाने 'ऑर्थोडॉक्स इस्टर'चे औचित्य साधत युक्रेनसोबत 32 तासांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत युद्धविरामाचे पालन करण्याचे संकेत दिले आहेत. या 32 तासांच्या अल्पशा विश्रांतीमुळे भविष्यात दीर्घकालीन शांतता करारासाठी दरवाजे उघडू शकणार आहेत.

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात होर्डिंग लावण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक

या बैठकीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, विनापरवाना होर्डिंग लावण्यास कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. तसेच शहरात उभारण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंगवर लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. बेकायदेशीरपणे लावण्यात आलेले सर्व होर्डिंग काढून टाकले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला होर्डिंग धारक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

West Bengal Elections : विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी ईडीने मोठी कारवाई केली आहे. एजन्सीच्या कोलकाता झोनल कार्यालयाने शहरात आठ ठिकाणांवर छापे टाकले. ही कारवाई बिस्वजीत पोद्दार ऊर्फ 'सोना पप्पू', जय एस. कमदार आणि इतरांविरुद्ध सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात करण्यात आली आहे. या छापेमारी दरम्यान ED ने तब्बल 1.47 कोटी रुपये रोख, 67.64 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, अनेक महत्त्वाची कागदपत्रं आणि डिजिटल उपकरणं जप्त केली आहेत. या कारवाईत ED ने एक 'फॉर्च्युनर' कार देखील जप्त केली असून, ही कार बिस्वजीत पोद्दार ऊर्फ सोना पप्पू वापरत होता.

India Economy : 2027 साठी देखील सकारात्मक संकेत; भारताचा जीडीपी ग्रोथ 7.3% राहण्याचा अंदाज

एशियन डेव्हलपमेंट बँकेने आर्थिक वर्ष 2027साठी भारताचा जीडीपी ग्रोथ 7.3% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. युरोपियन युनियनसोबतचा संभाव्य व्यापारी करार, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील वाढ आणि सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2027साठी थोडा कमी, म्हणजेच 6.9% विकासाचा अंदाज वर्तवला आहे.

America Vs Iran War : अमेरिकेचे 1800 कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता

अमेरिका आणि इराणमध्ये नुकताच 14 दिवसांचा युद्धविराम जाहीर झाला असला, तरी इराणच्या आखातातील परिस्थिती पुन्हा एकदा स्फोटक बनली आहे. अमेरिकेचे अत्यंत प्रगत आणि महागडे MQ-4C Triton हे पाळत ठेवणारे ड्रोन हॉर्मुझच्या आखातातून बेपत्ता झाले आहे. या घटनेमुळे अमेरिकन संरक्षण विभागात खळबळ उडाली असून, इराणने हे ड्रोन पाडले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.

Iran And USA : वैध हक्कांसाठी तडजोड नाही; इराणचे नेते मोजतबा खामनेई यांचा इशारा

"संघर्ष नको, पण हक्क सोडणार नाही!" इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामनेई यांनी आपल्या पहिल्या लेखी संदेशातून जगाला आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इराणला अमेरिका आणि इस्रायलसोबत युद्ध नको असले, तरी आपल्या अधिकारांच्या संरक्षणासाठी इराण कटिबद्ध आहे. होर्मुझ सामुद्रधुनीबाबत इराण नवी रणनीती आखण्याच्या तयारीत आहे.

Colonel Shrikant Purohit : मालेगाव स्फोटातून मुक्तता, कर्नल पुरोहित यांना ब्रिगेडियर पदावर पदोन्नती

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रदीर्घ कायदेशीर लढा देणारे कर्नल श्रीकांत पुरोहित यांना भारतीय लष्करात मोठी बढती मिळाली आहे. सशस्त्र बल न्यायाधिकरणाने दिलेल्या निकालानंतर लष्कराने त्यांना 'ब्रिगेडियर' पदावर पदोन्नत करण्यास मंजुरी दिली आहे. कर्नल पुरोहित 31 मार्च 2026 रोजी लष्करी सेवेतून निवृत्त होणार होते. मात्र त्यांच्या निवृत्तीला आता स्थगिती देण्यात आली आहे.

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या बहिणीला शिर्डी पोलिसांची नोटीस!

रुपाली चाकणकर यांच्या बहिण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांची नोटीस बजावलीय आहे. भोंदू खराविरोधात दाखल असलेल्या सावकारीच्या गुन्ह्यात समता पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहारांची चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावनंही या पतसंस्थेत 4 खाती असल्याचं निष्पन्न झालंय. तर पुढील पाच दिवसात जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

12 एप्रिलला सुनेत्रा पवार फोडणार प्रचाराचा नारळ!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार १२ एप्रिलला प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा भव्य प्रचार शुभारंभ सोहळा पार पडणार आहे. बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली असली तरी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी प्रचाराचे जोरदार नियोजन केले आहे.

बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे ‘भरोसा पत्र’ जाहीर, महिला-युवकांवर खास लक्ष

पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपने मोठी रणनीती आखत आपला जाहीरनामा सादर केला. अमित शाह यांनी कोलकात्यात कार्यक्रमात ‘भरोसा पत्र’ जाहीर केले. या दस्तऐवजात महिला, युवक आणि बेरोजगारांसाठी विशेष योजना मांडल्या असून प्रमुख मतदार गटांना आकर्षित करण्यावर भर दिला आहे.

Nashik Crime : नाशिकच्या IT कंपनीचं गेट तोडून आत शिरण्याचा प्रयत्न

नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय IT कंपनीत विशिष्ट धर्माच्या कर्मचाऱ्यांकडून हिंदू मुली व महिलांचे लैगिंक शोषण व धर्मातराचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ८ मुलींनी पुढे येत तक्रार दिली. ९ गुन्हे दाखल झाले आहेत. भाजप युवा मोर्चाने याविरोधात निषेध नोंदवला. संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी नाशिकच्या IT कंपनीचं गेट तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला.

Rajabhau Waje माझा ना कोणाशी संपर्क, ना कोणी मला संपर्क केलाय : खासदार वाजे 

"माझा ना कोणाशी संपर्क, ना कोणी मला संपर्क केलाय. मी आजही आणि उद्याही शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार म्हणून काम करत राहील" अशी प्रतिक्रिया खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिली आहे. ऑपरेशन टायगर बाबत ते बोलत होते.

Supriya Sule : अजितदादांच्या पक्षाने विचारले तर मी प्रचाराला जाईन : सुप्रिया सुळे

आगामी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केले आहे. "मी बारामतीला मतदार म्हणून जाणार आहे, मात्र अजितदादांच्या पक्षाने विचारले तर मी प्रचाराला जाईन," असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. रिश्ते मायने रखते है असं त्यांनी म्हटलं.

सिंधुदुर्गातील समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या अनाधिकृत एलईडी मासेमारीच्या विरोधात मालवणात पारंपारिक मच्छीमार रस्त्यावर उतरले आहेत. ठाकरे शिवसेनेतर्फे मालवण मत्स्य विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे.

नाशिकमधील नामांकित IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप युवा मोर्चाकडून IT कंपनीसमोर आंदोलन करण्यात आलं आहे.

रवींद्र एरंडेवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या रवींद्र एरंडेवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नोकरीचे आमिष दाखवून त्यानं नऊ जणांची फसवणूक केलीये असून त्यांच्याकडून 13 लाख 80 हजार रुपये उकळलेत. पोलिसांनी बनावट नियुक्तीपत्र ही जप्त केलेत. या प्रकरणात एरंडे याने निम्मे रक्कम रोख स्वरूपात स्वीकारल्याचीही माहिती समोर आली आहे.

कुंभमेळ्याच्या कामात सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांचा अडथळा

नाशिकमधील कुंभमेळ्याच्या कामात सत्ताधारी भाजपच्या पाच नगरसेवकांनी अडथळा आणल्यांचा आणि कंत्राटदाराला धमकावल्याचं शिवाय दोन महिला नगरसेवकांचे पती आणि तीन नगरसेवकांनी या संदर्भात थेट टक्केवारी मागितल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी कंत्राटदार शिवहरे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे सचिन मोरे यांनी थेट महापालिका आयुक्तांना पत्र दिल्यानंतर या प्रकरणाची माहिती थेट मुख्यमंत्री कार्यालयाला त्याची माहिती कळविण्यात आली. पोलीस आयुक्तांनाही पत्राची प्रत देण्यात आली. त्यानंतर संबंधित नगरसेवकांची चौकशी करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये सत्तापरिवर्तन अटळ - PM मोदी

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या पापांचा घडा भरला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तापरिवर्तन अटळ आहे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

पंतप्रधान नेतान्याहू यांची लेबनॉनसोबतच्या चर्चेला परवानगी

इस्रायलने इराण आणि अमेरिकीतील शस्त्रसंधीनंतरही लॅबनॉनवर हल्ले केले. ज्यामध्ये तब्बल ३०० नागरिकांचा मृत्यू झाला. इस्रायलच्या लेबनॉनमधील हल्ल्यांमुळे अमेरिका-इराण यांच्यात आता शस्त्रसंधीची चर्चा होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी लेबनॉनशी लवकरात लवकर चर्चेला परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अमेरिका-इराण यांच्यात शुक्रवारी पाकिस्तानमध्ये होणार्‍या शस्त्रसंधीतील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे.

IT कंपनी लैंगिक शोषण प्रकरणी पुण्यातील महिला मॅनेजर ताब्यात

नाशिक शहरातील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार तसेच एका युवकाचा धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाच्या तपासासाठी तपास पथकाने पुणे येथून कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या प्रमुख महिला व्यवस्थापकीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात रॉकेल विक्रीला परवानगी

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात रॉकेल विक्रीला परवानगी देण्यात आली असून 62 रुपये प्रति लिटरने रॉकेल मिळणार आहे.

बुलढाण्यातील भाविकांच्या बसचा वाराणसी-गोरखपूर मार्गावर भीषण अपघात

बुलढाण्यातील भाविकांच्या बसचा वाराणसी-गोरखपूर मार्गावरील गाझीपूरजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ३५ यात्रेकरू जखमी आहेत.

मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

मिरारोडमध्ये रामदेव पार्क परिसरात मनसेच्या पदाधिकाऱ्यावर मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

शशिकांत शिंदे शिवसेनेत आले तर मी त्यांचं स्वागत करेन : आमदार महेश शिंदे

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक असून ते ते शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागत मीच करेन असं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com