पुणे काँग्रेसमध्ये संघटन सृजन अभियानांतर्गत मोठे फेरबदल होण्याची शक्यता
दोन शहराध्यक्ष नियुक्त करून आठ विधानसभा मतदारसंघांची विभागणी केली जाऊ शकते
प्रशांत जगताप, अविनाश बागवे आणि इतर नावांची जोरदार चर्चा सुरू
Pune News : लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर पुढील तीन वर्ष कोणत्याही मोठ्या निवडणुका नाहीत. त्यामुळे या काळात पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षांची वाटचाल सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
पुण्यात काँग्रेसने देखील 'संघटन सृजन' अभियानांतर्गत पक्षांतर्गत मोठे फेरबदल करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धुमसणारी गटबाजी आणि शहराध्यक्षपदाचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस आता 'राष्ट्रवादी आणि 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची शक्यता आहे. पुण्यासाठी दोन शहराध्यक्ष नेमून गटबाजीला 'फुलस्टॉप' देण्याचा मध्यममार्ग काढला जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांची विभागणी करून दोन शहराध्यक्षांकडे प्रत्येकी चार मतदारसंघांची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. यामुळे कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर होईल आणि संघटनात्मक बांधणीला गती मिळेल, असा विश्वास वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे.
सध्या या शर्यतीत सध्या दोन नावे आघाडीवर आहेत. पहिले नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले प्रशांत जगताप. जगताप यांनी महापालिका निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून आपली ताकद सिद्ध केली आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतात त्यांनी मोठ्या कालावधीसाठी शहराध्यक्ष पदाची धुरा सांभाळी आहे. मात्र प्रशांत जगताप हे संपूर्ण पुण्याच्या जबाबदारीसाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या जागी ऐनवेळी संजय बालगुडे अथवा दीप्ती चौधरी यांचेही नाव समोर येऊ शकत.
दुसरीकडे, माजी मंत्री रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. नगरसेवक म्हणून काम करताना सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारा अभ्यासू आणि आक्रमक युवा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आता पुढील आठवडाभरामध्ये या नावांची घोषणा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
1. पुणे काँग्रेसमध्ये कोणते बदल होणार आहेत
दोन शहराध्यक्ष नियुक्त करण्याची शक्यता व्यक्त होत आहे
2. या अभियानाचे नाव काय आहे
काँग्रेसचे ‘संघटन सृजन’ अभियान सुरू आहे
3. शहराध्यक्षपदासाठी कोणाची नावे चर्चेत आहेत
प्रशांत जगताप, अविनाश बागवे, संजय बालगुडे आणि दीप्ती चौधरी यांची नावे चर्चेत आहेत
4. या बदलांचा उद्देश काय आहे
कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करून संघटन मजबूत करणे
5. किती विधानसभा मतदारसंघांची विभागणी होणार आहे
पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांची विभागणी होऊ शकते
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.