Congress Politics : भाजपला मोठा धक्का, तीन माजी आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

BJP Vs Congress Uttarakand : उत्तरखंडमध्ये पुढील वर्ष विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वीच काँग्रेसमध्ये होत असलेल्या पक्ष प्रवेशाने काँग्रेस मजबुत स्थितीत दिसत आहे.
Congress Politics
Congress Politicssarkarnama
Published on
Updated on

Congress News : काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्याआधी भाजपचे माजी आमदार राजकुमार ठुकराल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बसपाचे माजी आमदार नारायण पाल यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

उत्तरखंडच्या प्रभारी कुमारी शैलजा यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये हा प्रवेश झाला. ठुकराल यांच्यासोबत भाजपचे माजी आमदार भीमलाल आर्य, माजी महापौर गौरव गौयल, लखन सिंह यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

उत्तरखंडमध्ये पुढील वर्ष विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वीच काँग्रेसमध्ये होत असलेल्या पक्ष प्रवेशाने काँग्रेस मजबुत स्थितीत येत असल्याचादा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे.

काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले भाजपचे माजी आमदार राजकुमार ठुकराल हे मोठे नेते मानले जातात. ते दोन वेळा आमदार झाले आहेत. 2022 मध्ये पक्षाने त्यांना तिकीट नाकारले होते. तेव्हा त्यांनी अपक्ष निवडणूक लढली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

Congress Politics
BJP election strategy : बिहार निवडणुकीत भाजपने केलेल्या खर्चाचे धक्कादायक आकडे समोर, निकालही मनासारखा; काँग्रेस जवळपासही नाही...

पक्षाकडून अवहेलना

राजकुमार ठुकराल यांना भाजपने 2022 मध्ये तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी महापौर निवडणुकीत भाजपला साथ देत महापौर निवडून आणला होता. मात्र, पक्षात दुर्लक्षित केले जात असून संधी दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षामध्ये अवहेलना होत असल्याने नाईलाजाने आपण पक्ष सोडत असल्याचे त्यांनी सांगितले.

Congress Politics
BJP Parbhani politics : गंगाखेड पंचायत समितीवर भाजपचा भगवा! तरुणाच्या खांद्यावर सभापतीपदाची धुरा; विरोधकांचे धाबे दणाणले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com