pune pmc ajab karbhar news;  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vasant More : धक्कादायक: पुण्यात चक्क पाच मजली बिल्डिंग 'चोरीला'? महापालिकेचा 'जादूई' कारभार उघड!, हातात दुर्बीण घेऊन वसंत मोरेकडून शोध

pune pmc ajab karbhar news : पुणे महानगरपालिकेचा पुन्हा एकदा अजब कारभार समोर आला असून महापालिकेच्या कागदोपत्रातून चक्क एक पाच मजली इमारतच गायब झाली आहे.

Sudesh Mitkar

  1. पुणे महापालिकेच्या कागदोपत्री पाच मजली इमारत गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  2. गुजर-निंबाळकरवाडी परिसरातील या प्रकरणावरून माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पीएमसीवर निशाणा साधला.

  3. हातात दुर्बीण घेऊन इमारत शोधण्याची मोहीम राबवत वसंत मोरे यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Pune News : पुणे महानगरपालिकेचा अजब कारभार आणि अतरंगी किस्से नवे नाहीत, पण आता चक्क एक पाच मजली इमारतच महापालिकेच्या कागदोपत्री 'गायब' झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

प्रभाग क्रमांक ३८ मधील गुजर-निंबाळकरवाडी परिसरात हा प्रकार घडला असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी चक्क हातात दुर्बीण घेऊन ही इमारत शोधण्याची मोहीम राबवल्याचं पाहायला मिळालं.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सहा मजली इमारतीचा मालमत्ता कर नियमितपणे भरला जात आहे. महापालिका दरवर्षी या इमारतीकडून टॅक्स वसूल करते, मात्र जेव्हा अधिकृत दप्तरी तपासणी करण्यात आली, तेव्हा ही इमारत अस्तित्वातच नसल्याचे दिसून आले. "टॅक्स घेताना इमारत दिसते, मग रेकॉर्डवर का नाही?" असा सवाल आता वसंत मोरे यांच्या कडून उपस्थित केला जात आहे.

वसंत मोरेंची 'दुर्बीण' स्टाईल

पालिकेच्या या 'जादूई' कारभाराचा पंचनामा करण्यासाठी वसंत मोरे यांनी थेट घटनास्थळ गाठले. हातात दुर्बीण घेऊन इमारतीचा शोध घेतानाचा त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्रशासनावर टीका करताना मोरे म्हणाले, "महापालिका अधिकारी जागेवर जाऊन कर आकारणी करतात. घरपट्टीची पावती फाडली जाते, पण सिस्टिममध्ये मात्र इमारत दिसत नाही. ही इमारत नक्की गेली कुठे? की अधिकाऱ्यांनी संगनमताने ती चोरली आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच हा प्रकार केवळ तांत्रिक चूक नसून त्यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार असल्याचा आरोप देखील वसंत मोरे यांनी केला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेचा हा 'अदृश्य इमारती'चा कारभार सध्या शहरात राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.

FAQs :

1. पुण्यात कोणती इमारत गायब झाल्याचा दावा करण्यात आला आहे?

गुजर-निंबाळकरवाडी परिसरातील पाच मजली इमारत पीएमसीच्या नोंदीतून गायब झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

2. या प्रकरणात वसंत मोरे यांनी काय केलं?

वसंत मोरे यांनी हातात दुर्बीण घेऊन प्रतीकात्मक आंदोलन करत इमारत शोध मोहीम राबवली.

3. हा प्रकार कुठे घडला?

हा प्रकार पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३८ मध्ये घडल्याचं सांगितलं जात आहे.

4. पीएमसीवर कोणते आरोप होत आहेत?

महापालिकेच्या नोंदींमध्ये गंभीर गोंधळ किंवा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे.

5. या प्रकरणामुळे राजकीय प्रतिक्रिया काय उमटल्या?

विरोधकांनी पीएमसी प्रशासनावर जोरदार टीका करत पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT