

Pune Municipal Corporation : नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांचा तब्बल अकराशे मतांनी पराभव झाला. तर या ठिकाणी भाजपचे व्यंकोजी खोपडे हे विजयी झाले आहेत. या निकालानंतर वसंत मोरे यांच्याकडून व्यंकोजी खोपडे यांच्यावर विविध आरोप करण्यात आले आहेत.
वसंत मोरे यांनी व्यंकोजी खोपडे यांची अनेक अनधिकृत बांधकाम असून त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करा व याबाबत केस देखील कोर्टात दाखल केली आहे. यानंतर आता वसंत मोरे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र दिले आहे. या पत्रात व्यंकोजी खोपडे हे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गुजर निंबाळकरवाडी या गावचे जेव्हा सरपंच होते त्यावेळी त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांना महापालिकेकडून देण्यात येणारा विकास निधी देऊ नये अशी मागणी केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या पत्रात वसंत मोरे यांनी म्हटलं आहे की 2017 ते 2021 या कालावधीमध्ये गुजरवाडी निंबाळकरवाडी मध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात होती. या कालावधीमध्ये गुजरवाडी निंबाळकरवाडी ग्रामपंचायत मध्ये आलेला कोट्यावधी रुपयांच्या निधीचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. सध्याचे भाजपचे नगरसेवक आणि तत्कालीन गुजर निंबाळकर वाडीचे सरपंच व्यंकोजी खोपडे यांचा या भ्रष्टाचारात सहभाग आहे. भ्रष्टाचाराबाबत जिल्हा परिषदेकडे तकार करण्यात आली असून समिती नेमून त्याच्यावर कारवाई सुरू आहे.
मात्र व्यंकोजी मारुती खोपडे हे आता महापालिकेचे नगरसेवक आहेत. त्यांनी पूर्वी केलेल्या विकास निधी बाबतचा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार पाहता, हा प्रकार पुणे महानगरपालिकेच्या विकास निधीच्या बाबतीतही घडू शकतो. म्हणून खोपडे यांच्या बाबतीत पुणे जिल्हा परिषदेमध्ये केलेल्या तक्रारींचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना कोणताही विकास निधी देऊ नये अशी मागणी वसंत मोरे यांनी केली आहे.
तसंच याबाबत खासदार मुरलीधर मोहोळ यांना देखील आपण मागणी करणार असून अशा प्रकारच्या भ्रष्टाचारी लोकांमुळे आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होत असून याबाबत कारवाई करावी अशी आपण मागणी करणार असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.