Vishal Agarwal: Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Agarwal: मुख्यमंत्री शिंदेंनी विशाल अग्रवालच्या MGP क्लबवर चालवला 'बुलडोझर'

Pune Porsche Accident Vishal Agarwal Mahabaleshwar Club Demolished By CM Ekanath Shinde Orders : विशाल अगरवाल यांचे महाबळेश्वर कनेक्शन उघड झाल्यानंतर त्यांनी सरकारी जमिनीवर पंचतारांकित हॉटेल उभारल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पुन्हा एकदा महाबळेश्वर व पाचगणी परिसरातील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर आला.

Umesh Bambare-Patil

Vishal Agarwal News : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे नाव आल्यानंतर त्यांचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचे पाय आणखी खोलात गेले आहेत. महाबळेश्वर येथील त्यांच्या एमपीजी क्लब रिसॉर्टवर प्रशासनाने रविवारी बुलडोझर फिरवला.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अगरवाल (Vishal Agarwal) याच्या पंचतारांकित हॉटेलला सील केले होते. आज बांधकामावर हातोडा टाकल्यामुळे अगरवाल यांना आणखी एक दणका बसला आहे.

महाबळेश्वर येथील सरकारी जमिनीवर उभारलेल्या विशाल अगरवाल यांच्या एमपीजी क्लबच्या खोल्याचे बांधकाम आज जिल्हा प्रशासनाने पाडले.महाबळेश्वर पालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.

महाबळेश्वर (Mahabaleshwar) व पाचगणी परिसरात सरकारी जमिनीवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. याबाबत सातत्याने लोकप्रतिनिधींकडून आवाज उठवला जात आहे. पण, स्थानिक पालिका प्रशासन किंवा महसूल विभागाकडून कोणतीही हालचाल होत नव्हती.

कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल यांचे महाबळेश्वर कनेक्शन उघड झाल्यानंतर त्यांनी सरकारी जमिनीवर पंचतारांकित हॉटेल उभारल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पुन्हा एकदा महाबळेश्वर व पाचगणी परिसरातील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत कडक भूमिका घेत महाबळेश्वरातील अगरवाल असो वा अन्य कोणी बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर फिरवा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महाबळेश्वर पालिका व वाईचे प्रांताधिकारी यांना सूचना करुन तातडीने कारवाईचे सूचना केली होती.

पालिकेने विशाल अगरवाल यांचे एमपीजी क्लब हॉटेल महाबळेश्वर पालिका प्रशासनाने सील केले होते. आज यापुढील कारवाई करत महाबळेश्वर पालिका व महसूल प्रशासनाने या क्लबचे बेकायदेशीर असलेल्या सहा खोल्या जेसीबीच्या सहाय्याने पाडल्या आहेत. त्यामुळे अगरवाल यांना हा दुसरा दणका बसला आहे.

आता आणखी किती बेकायदेशीर बांधकामांवर महसूल प्रशासन हातोडा फिरवणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. रहिवाशी भाडेपट्टीवर असलेल्या या जागेचा व्यापारी कारणासाठी वापर होत असल्याचे आढळून आले होते. यानंतर हा एम पी जी क्लबवर प्रशासनाने टाळे ठोकले होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतल्यानंतर या जागेवर उभारण्यात आलेल्या १२ अनधिकृत खोल्या जमिनोदोस्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. शनिवारी सकाळीच महाबळेश्वर नगरपालिकेने अनधिकृत बांधकामे जमिनोदोस्त करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT