Nagpur and Pune Airlines
Nagpur and Pune Airlines sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

साई भक्तांसाठी गुड न्यूज ; पुणे-शिर्डी-नागपूर विमानसेवा सुरू

सरकारनामा ब्युरो

शिर्डी : साई भक्तांसाठी गुड न्यूज आहे. येत्या १८ फेब्रुवारी पासून पुणे -शिर्डी, नागपूर विमानसेवा (Nagpur and Pune Airlines)सुरु होत आहे. नागपूर व पुणे विमान सेवा सुरू करण्यासंदर्भात अनेक दिवसांपासून प्रवाशांसह साई भक्तांचीही मागणी होती त्यानुसार विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिर्डी विमानतळाची संचालक सुशील कुमार श्रीवास्तव (Shirdi Airport Director Sushilkumar Srivastava)यांनी दिली.

कोरोनामुळे मध्यंतरी 18 महिने शिर्डी विमानतळावर विमान सेवा बंद होती, आता विमान सेवा सुरळीत झाली आहे. सध्या चार ठिकाणांसाठी विमान सेवा सुरू आहे. बंगळूलूरसाठी 2 दिल्लीसाठी 1 हैदराबाद 1 चेन्नई 1 अशा पाच विमान फेऱ्या आहेत. आता पुणे- शिर्डी नागपूर अशी विमान सेवा सुरू होणार आहे.

पुणे येथून येणारे विमान शिर्डी येथे येईल व तेच विमान नागपूरला जाणार आहे. त्याच दिवशी हे विमान नागपूरहून शिर्डीला येईल व तिथून पुणे येथे जाणार आहे. ही विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू ठेवण्याचा विमान कंपनीचा मानस आहे.

विमानतळ विकास प्राधिकरणाने (Airport Development Authority)याबाबतची तयारी केली आहे. एअर इंडिया ही विमानसेवा (Air India is the Airline)सुरु करणार आहे, अशी माहिती यांनी दिली .

या विमानतळाच्या भरवशावर काकडीतील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांनी बँकांकडून कर्ज घेऊन प्रवाशी वाहने खरेदी केली. मात्र सध्या उड्डाणे कमी असल्याने प्रवाशीसंख्या रोडावल्याने रोजगार बुडाला असल्याचे येथील गावकऱ्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT